मुंबई : विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालिका शारदाबेन संघवी (६५) यांचे २७ मार्च रोजी अकस्मात निधन झाले. विपश्यना विद्या भारतात आणणारे सत्यनारायण गोएंका यांच्या त्या अत्यंत निकटच्या सहकारी होत्या.१९८१ साली शारदाबेन संघवी यांनी धम्मगिरी येथे विपश्यना शिबिरात सहभाग घेतला. त्यांनी लहान मुलांपासून मोठ्यांना विपश्यनेचे मूलभूत धडे दिले. १९९४ मध्ये विपश्यना विद्येच्या सहअध्यापिका म्हणून गोएंका गुरुजींनी त्यांची नियुक्ती केली. याचवेळी त्यांनी पाली भाषेचा अभ्यास सुरू केला आणि १९९९ साली त्यांनी पाली भाषेत डॉक्टरेट मिळविली. गोएंका गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली २००० साली त्यांनी विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. इगतपुरीच्या धम्म तपोवनमध्ये सुरू असलेल्या ४५ दिवसांच्या कोर्सदरम्यान त्यांचे २७ मार्च रोजी अकस्मात निधन झाले.
शारदाबेन संघवी यांचे निधन
By admin | Updated: March 30, 2015 04:19 IST