शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम गोव्यात पूर्णपणे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 15:12 IST

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम गोव्यात पूर्णपणे ठप्प झाले आहे. गेले सात महिने पक्षाची एक देखील बैठक झालेली नाही आणि पक्षाचे कुणीच निरीक्षकही गोव्यात आलेले नाही.

-सदगुरू पाटील

पणजी : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम गोव्यात पूर्णपणे ठप्प झाले आहे. गेले सात महिने पक्षाची एक देखील बैठक झालेली नाही आणि पक्षाचे कुणीच निरीक्षकही गोव्यात आलेले नाही.

पवार यांनी बारा वर्षांपूर्वी गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा सुरू केली होती. गोव्याचे माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांच्याकडे पवार यांनी राष्ट्रवादीची  धुरा सोपवली होती. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढावा असा प्रयत्न प्रारंभी पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी केला. पटेल हे गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी होते. प्रारंभी काँग्रेस पक्षासोबत युती करून राष्ट्रवादी काँग्रेस हा गोव्यात सत्तेचाही वाटेकरी झाला. राष्ट्रवादीचे गोवा विधानसभेत दोन किंवा तीन आमदार कायम असत होते आणि सरकारमध्येही दोघांना मंत्रीपदे मिळायची.

गेल्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अन्य सगळे उमेदवार हरले. एकटे चर्चिल आलेमाव हे स्वत:च्या  बळावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले. मात्र चर्चिल आता फक्त तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीसोबत आहेत. प्रत्यक्षात ते भाजपप्रणीत  आघाडी सरकारच्या सर्व निर्णयांना पाठींबा देत आहेत.

फेब्रुवारीतील निवडणुकीत गोव्यात काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती केली नव्हती. एकेकाळी  विल्फ्रेड डिसोझा, मिकी पाशेको, नीलकंठ हलर्णकर, जुझे फिलीप डिसोझा असे आमदार व मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आता. राष्ट्रवादीकडे  गोव्यात धड राज्य कार्यकारिणीही राहिलेली नाही व पदाधिकारीही नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पणजीतील कार्यालयात कुणीच कार्यकर्ते येत नाहीत. आमदार झाल्यानंतर आलेमाव यांनी कार्यालयात  पाऊलही ठेवलेले नाही. 

पवार आणि पटेल यांना गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम वाढविण्यात आता मोठासा रस राहिलेला नाही अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. गेल्या निवडणुकीत बहुतांश पदाधिकारी पक्षाला सोडून गेले. आता फक्त प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा आणि दोन-तीन पदाधिकारी शिल्लक आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसgoaगोवा