शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

‘उत्तराधिकारी’ दिल्लीसाठीही महत्त्वाचा! शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी कुणाशीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 08:46 IST

राजकीय महानाट्यावर कसा पडदा पडणार याकडे देशाचे लक्ष 

सुनील चावके मुंबई/नवी दिल्ली  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर शरद पवार ठाम राहिल्यास त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हा प्रश्न केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर राष्ट्रवादीच्या दिल्लीतील राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. 

दिल्लीत गेली चार दशके साखरपेरणी करणारे शरद पवार यांची जागा घेण्याइतकी क्षमता आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणातच नाही. पवार यांची सावली मानले जाणारे प्रफुल्ल पटेल तसेच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे उत्तम नेटवर्किंग असले तरी दिल्लीच्या  राजकारणात शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी करण्यासाठी ते पुरेसे नाही.

जबाबदाऱ्यांच्या त्रिभाजनाचा पर्यायविचारधारा आणि पक्षभेद विसरून सर्व राष्ट्रीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याची क्षमता सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये असली तरी ते विश्वासार्हतेच्या बाबतीत शरद पवार यांच्या तुलनेत कमी पडतात. अशा स्थितीत शरद पवार सध्या एकट्याने सांभाळत असलेल्या राज्याच्या तसेच राष्ट्रीय नेतृत्वाच्या जबाबदारीचे अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांमध्ये त्रिभाजन करावे लागेल.

आगामी लोकसभा निवडणूक शेवटची? पुढच्या वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक ही शरद पवार यांच्यासाठी राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होण्यापूर्वीची कदाचित शेवटची निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. ही निवडणूक होईपर्यंत राज्यातील आणि देशातील राजकारणात आपले महत्त्व शाबूत ठेवण्याला शरद पवार यांनी प्राधान्य दिले आहे. २०२४ साली सत्तेची बाजी विरोधकांच्या हाती आल्यास पवार यांना सर्वसंमतीने पंतप्रधान होण्याची अनपेक्षित संधी मिळू शकेल. 

‘अदृश्य’ दबाव झुगारण्यासाठी धडपडराज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करावी म्हणून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर, विशेषतः अजित पवार यांच्यावर ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा अदृश्य दबाव असल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसवर दरदिवशी वाढत जाणारा अदृश्य दबाव परतावून लावण्यासाठी शरद पवार यांना कधी केंद्रातील मोदी सरकारची मर्जी सांभाळण्यासाठी तर कधी विरोधकांना खूश करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून सतत कोलांटउड्या माराव्या लागल्या असून, अनेकदा परस्परविरोधी विधाने करावी लागली आहेत. 

...तर राष्ट्रवादीचीही अवस्था शिवसेनेसारखीच? अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन तृतीयांशापेक्षा जास्त आमदार फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची भाजपची रणनीती आहे. तसे झाल्यास खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची असा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात उपस्थित होईल. एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जशी अवस्था झाली, तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस