शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
5
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
6
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
7
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
8
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
9
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
10
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
11
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
12
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
13
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
14
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
15
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
16
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
17
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
18
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
19
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
20
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

भुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 3:44 PM

भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.  आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ दोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांच्या शारीरिक आरोग्यवर परिणाम होतो आहे. त्यामुळे वयाच्या 71 व्या वर्षी तुरुंगात राहण्याची वेळ आलेल्या छगन भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही शरद पवारांनी पत्रातून दिला आहे.

शरद पवार यांनी पत्रात म्हंटलं आहे की,काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या सतत बिघडत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला फार चिंता वाटते आहे. त्यांचं वय 71 वर्ष असून ते 14 मार्च 2016 पासून (2 वर्ष) तुरुंगात आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालील आहे.भुजबळांचं प्रकरण पूर्णपणे कायदेशीर आहे. माननीय कोर्टाने छगन भुजबळ यांच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत कोर्ट अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल. "जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे." हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही.छगन भुजबळ हे ओेबीसी नेते असून 50 वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही. माझी फार अपेक्षा नाही. पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे.छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता, आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे. मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस