शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भटका समाज जातींमध्ये विखुरलेला, जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:05 IST

भटके विमुक्त ओबीसी संघटनेचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर: भटका समाज हा जातींमध्ये विखुरला असून, या समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी या जनगणनेचा प्रश्न संसदेमध्ये मांडण्याची ग्वाही रविवारी दिली. सोलापुरात भटके विमुक्त ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा रविवारी राज्यव्यापी मेळावा झाला. पवार यांनी या मेळाव्यास संबोधित केले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते.

विखुरलेला भटका समाज नेमका किती याचा शोध घेतला पाहिजे, यासाठी जातीनिहाय जनगणना व्हावी ही समाजाची मागणी रास्त असून, यासाठी आम्ही संसदेमध्ये पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहोत, असे पवार यावेळी म्हणाले. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. या समाजास ऊर्जितावस्था मिळण्यासाठी सुरू केलेल्या आश्रमशाळा जाचक अटींमुळे कमी होत असल्याची चिंताही पवार यांनी व्यक्त केली.

पाच मराठा आंदोलकांना घेतले ताब्यात

सोलापूरच्या मेळाव्याआधी बार्शी येथील शेतकरी मेळाव्याला शरद पवार यांनी संबोधित केले. भाषण सुरू असताना, अचानक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना काळे झेंडे दाखविले. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. त्यांना ताब्यात घेईपर्यंत मध्यभागी सभेत एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

कुर्डूवाडीत विचारला जाब

टेंभूर्णी-कुर्डूवाडी रस्त्यावरील अंबाड येथे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी शरद पवार यांचा ताफा थांबविला. स्वागत स्वीकारून परत गाडीत बसताना अचानक मनसेचे तालुकाध्यक्ष सागर लोकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर पाठिंबा आहे, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSolapurसोलापूर