शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

गोंदियाच्या शिक्षक साहित्य संमेलनात शरद पवार येणार; संमेलनाच्या अध्यक्षपदी वामन केंद्रे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 7:36 PM

गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक आणि नाटककार वामन केंद्रे यांची निवड झाली असून खासदार प्रफुल्ल पटेल संमेलनाचे उदघाटन करणार आहेत. २३ डिसेंबर २०१८ रोजी नटवरलाल माणिकलाल दलाल आर्टस् व कॉर्मर्स महाविद्यालय, गोंदिया येथे हे साहित्य संमेलन होत आहे. 

शिक्षक साहित्य संमेलनाचे संस्थापक आमदार कपिल पाटील, माजी खासदार नाना पटोले, कवयित्री प्रभा गणोरकर, संमेलन संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्यासह राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली आहे. 

आठ वर्षांपूर्वी शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे संमेलन सुरु झाले. यापूर्वीची सात संमेलनं मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत.

आजपर्यंत कवयित्री नीरजा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नाटककार शफाअत खान, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, लोकशाहीर संभाजी भगत, ख्यातनाम लेखक प्रविण बांदेकर, कवी जयवंत पाटील यांनी यापूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, हिंदूकार डॉ. भालचंद्र नेमाडे, ख्यातनाम विचारवंत प्रा. पुष्पा भावे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुलभा देशपांडे, नितीन वैद्य, कवी वसंत आबाजी डहाके, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कादंबरीकार रंगनाथ पठारे, गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे यापूर्वीच्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी २२ डिसेंबर रोजी ग्रंथदिंडी, टॉक शो, झाडीपट्टीतील नाटके आणि मुख्य सोहळा २३ डिसेंबर रोजी उदघाटन सोहळा, निमंत्रित कवींचे संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार