शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 06:36 IST

लाेकसभेचा तिसरा टप्पा; ११ मतदारसंघांत ६१% मतदान; राज्यात सर्वाधिक कोल्हापुरात , देशात आसाम टाॅपर, उत्तर प्रदेश तळात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आल्यानंतर तिसऱ्या टप्पातही असेच चित्र दिसले. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची रात्री १०.४० पर्यंतची आकडेवारी पाहता पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ११ राज्यांतील ९३ जागांसाठी ६३.५३ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राज्यात सर्वात कमी मतदान झाले. २०१९ मध्ये येथे ६१.८२ टक्के मतदान झाले हाेते. यंदा ५४.१८ टक्के मतदानाची नाेंद झाली. बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट लागले.  

 उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता निवडणूक आयोगानेही मतदारांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, अनेक ठिकाणी सकाळी मतदानासाठी गर्दी झाली होती. दुपारी प्रमाण कमी झाले, सायंकाळी पुन्हा अनेक केंद्रांवर रांगा होत्या. अनेक प्रमुख नेत्यांनी सकाळच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद येथे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी बारामतीत मतदान केले. 

अनेक नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदतिसऱ्या टप्प्यात अमित शाह, शिवराजसिंह चौहान, दिग्विजय सिंह, सुप्रिया सुळे, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, सी.आर. पाटील, डिंपल यादव, युसुफ पठाण, शाहू महाराज छत्रपती, उदयनराजे भोसले, बसवराज बोम्मई, मनसुख मांडविया, प्रणिती शिंदे, विजय बघेल आदी नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. 

केंद्राबाहेर खूनधाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तीन तरुणांमध्ये वादानंतर धारदार शस्त्राने भोसकून तरुणाचा खून झाल्याची घटना.

ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्नसोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील बागलवाडी गावातील दादासाहेब चळेकर या मतदाराने केंद्रावरील तिन्ही ईव्हीएम पेटविण्याचा प्रयत्न केला. 

आपल्या देशात दानधर्माला बरेच महत्त्व आहे. त्यापैकी मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ही भावना लक्षात घेता देशवासीय मोठ्या प्रमाणात मतदान करतील, हा विश्वास वाटतो. नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडलेपश्चिम बंगालच्या चार लोकसभा मतदारसंघातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. त्यापैकी मुर्शिदाबाद व जांगीपूरमध्ये काही ठिकाणी तृणमूल कॉंग्रेस, भाजप व कॉंग्रेस-सीपीआयचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामती