शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा यू टर्न? आधी म्हणाले- ते आमचेच नेते, नंतर म्हणतात- तसे नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 06:01 IST

पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. संधी सारखी मागायची अन् द्यायचीही नसते: शरद पवार

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती/सातारा : अजित पवार हे आमचेच नेते  आहेत, राष्ट्रवादीत फूट नाही, असे ज्येष्ठ  नेते शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले. कोल्हापूर येथील सभेला बारामतीतून निघण्यापूर्वी त्यांच्या गाेविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागल्यानंतर मात्र त्यांनी दहीवडी (जि. सातारा) येथील जाहीर सभेत बोलताना घुमजावदेखील केले. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. संधी सारखी मागायची अन् द्यायचीही नसते, असे स्पष्ट करत त्यांनी अजित पवार यांना आता संधी नसल्याचा इशाराच सभेत दिला.

काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे पवार बारामतीत म्हणाले. बारामतीकरांनी अजित पवार यांचा आयोजित  नागरी सत्कार अवघ्या २४ तासांवर आलेला असताना पवार यांनी हे वक्तव्य केले, हे विशेष.

माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे केलेल्या वक्तव्याबाबत पवार यांना प्रश्न केला असता, त्यावर सुप्रिया सुळे यांच्या मताचे शरद पवार यांनी समर्थन केले. ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही, असे शरद पवार म्हणाले.

बीड येथील माझ्या सभेनंतर जर कोणी तिथे आपली भूमिका मांडण्यासाठी येत असेल तर त्याचे लोकशाहीमध्ये स्वागत व्हायला हवे, असेही शरद पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले... ‘नो कमेंट्स’ 

  • ‘अजित पवार आमचेच नेते आहेत’, असे शरद पवार म्हणाले आहेत याकडे लक्ष वेधले असता अजित पवार यांनी, ‘नो कमेंट्स, फक्त विकासाचे बोला, असे पिंपरी (पुणे) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 
  • सर्वसामान्य लोकांना विकास हवाय. तुम्ही लोक जसे पाहता, त्याउलट मी पाहतो. मला विकासाशिवाय इतर कशावरही भाष्य करायचे नाही’, असे म्हणत त्यांनी राजकीय प्रश्नांना बगल दिली.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार