शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांनी स्वतःची ताकद आजमावली, हे पक्षांतर्गत बंड शमवण्यासाठी केलेलं नाटक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 22:56 IST

"शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी बरोबर वेळवर टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी बरोबर गुगली टाकली आणि ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रमही केला."

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर, पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी पक्षातील असंख्य कार्यकर्ते आडून बसले होते. यानंतर आज शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. पवारांच्या या निर्णयानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. या संपूर्ण प्रकारातून शरद पवार यांनी आपली ताकद आजमावली. तसेच पक्षांतर्गत बंडाळी शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटक जरी असले, तरी तो एक इशारा त्यांनी दिला असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.    

शिरसाट म्हणाले, "दोन तारखेचा जो अॅपिसोड होता तो व्यवस्थित पाहिला तर, शरद पवारांनी राजीनामी दिला, त्याची कोणतीही रिअॅक्शन सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर नव्हती. त्यावेळ मनात एक शंका नक्कीच होती, ती म्हणजे एढ्या मोठ्या पदाचा राजीनामा शरद पवार देत आहेत आणि राजकारणातून बाजूला होत आहेत. याचा अर्थ काही तरी घडतंय हे नक्की. पण त्याचा दिखावा कुठेही झालेला नाही. मला वाटते, या संपूर्ण राजीनामा नाटकात सर्वात मोठी भूमिका इतर बाकिच्या लोकांनीही निभावली. शरद पवारांनी पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला आहे. आता पुन्हा अशी हिंमत कराल तर मी माझा बडगा तुम्हाला दाखवीन, असा इशारा शरद पवारांनी या राजीनामा नाट्यातून दिला आहे."

शरद पवार यांनी आपली ताकद आजमावली -या संपूर्ण प्रकारातून शरद पवार यांनी आपली ताकद आजमावली. आजही आपण ग्राऊंडलेवलला कुठवर आहोत, याची परीक्षाही घेतली. तसेच पक्षांतर्गत जे काही थोडे बहूत बंडाळीचे चिन्ह दिसत होते, त्याला शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटक जरी असले, तरी तो एक इशारा त्यांनी या माध्यमातून दिला आहे, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला -"शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी बरोबर वेळवर टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी बरोबर गुगली टाकली आणि ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रमही केला. ज्यांना इशारा द्यायचा त्यांना इशाराही दिला आणि आता आणखी माझे वय झालेले नाही, मी राजकारणातच राहणार आहे. हे त्यांनी आता अधोरेखितही केले आहे," असेही शिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Shirsatसंजय शिरसाटNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना