शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

"हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच..."; 'विश्वविजेत्या' दिव्या देशमुखसाठी शरद पवारांची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 20:35 IST

Sharad Pawar, Divya Deshmukh: मराठमोळी दिव्या देशमुख बनली भारताची पहिली महिला बुद्धिबळ 'वर्ल्ड चॅम्पियन'

Sharad Pawar on Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर आज महाराष्ट्राच्या लेकीने नवा अध्याय लिहिला. नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे (Women's Chess World Cup Final) विजेतेपद जिंकले. ३८ वर्षांच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत करत दिव्याने हा बहुमान मिळवला. महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारी दिव्या देशमुख पहिलीवहिली भारतीय ठरली. दोन्ही खेळाडूंमधील सुरूवातीचे सामने अनिर्णित राहिले होते. त्यानंतर आज, सोमवारी रॅपिड राऊंड्समध्ये दिव्या देशमुखने विजेतेपद (Chess World Champion) पटकावले. बुद्धिबळाच्या पटावरील उदयोन्मुख खेळाडू असलेल्या दिव्याचे राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्व असलेल्या शरद पवार यांनी कौतुक केले.

शरद पवार काय म्हणाले?

"जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women's World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल! सामन्या अंती विजेत्या बुद्धिबळपटू FIDE Women's World Cup जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरणार होत्या आणि तो मान दिव्या देशमुख ह्यांनी पटकाविला त्याबद्दल दिव्या देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, टीमचं मनापासून अभिनंदन. तसंच गेली अनेक वर्ष भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या कोनेरू हम्पी ह्यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. खरं तर आज आपल्या देशाला विजेत्या आणि उपविजेत्या अशा एक नव्हे तर दोन ग्रँडमास्टर लाभल्या. जय हिंद !" अशा शब्दांत शरद पवार यांनी दिव्याचे कौतुक केले.

सुप्रिया सुळेंनीही केलं अभिनंदन

"जॉर्जिया येथे पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख हिने विजेतेपद पटकावले. भारताचीच कोनेरु हंपी उपविजेती ठरली आहे. दिव्या १९ वर्षांची असून ती नागपूरची रहिवासी आहे. दिव्याचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा," असे ट्विट त्यांनी केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChessबुद्धीबळ