शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार म्हणाले, मला आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 11:02 IST

सन २००४ पासून मी लढविलेल्या निवडणुकांची चौकशी त्यांना करायची आहे, असे पवार यांनी सांगितले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. सन २००४ पासून लढवलेल्या निवडणुकांची चौकशी त्यांना करायची आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस आनंदी दिसले नाहीत; मात्र भाजपत आदेश पाळावे लागतात, अशी टीकाही पवार यांनी केली. मोदीबागेतील निवासस्थानी पवार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. आयकर विभागाची प्रेमपत्रे आली आहेत. सन २००४ पासून मी लढविलेल्या निवडणुकांची चौकशी त्यांना करायची आहे, असे पवार यांनी सांगितले. विरोधी विचारांच्या लोकांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचाच हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.नव्या सरकारविषयी पवार म्हणाले, शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा नसावी व फडणवीस यांनाही उपमुख्यमंत्रिपद घ्यावे असे वाटले नसेल; पण भारतीय जनता पक्ष आदेशावर चालतो. त्यामुळे फडणवीस शपथ घेताना आनंदी दिसत नव्हते. फडणवीस यांनी लोकांमधून निवडून येऊन सरकार बनवले असते तर मी त्यांना शाबासकी दिली असती. शिवसेना संपुष्टात आली असे वाटत नाही. याआधीही शिवसेनेत असे झाले आहे. विधिमंडळ पक्ष व संघटना वेगवेगळे असते. त्यामुळे शिवसेना संघटना उद्धव ठाकरे यांचीच राहील. भाजपने आता जो निर्णय घेतला तो २०१९ च्या निवडणुकीनंतर लगेच घेतला असता तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. शिवसेनेतून बाहेर गेलेले परत येतील, असे वाटत नाही. बंड केलेले सदस्य महाराष्ट्रात आले असते तर काही करता आले असते. नव्या सरकारबद्दल लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ते किती दिवस टिकेल हे सांगायला ज्योतिषी नाही. महाविकास आघाडी म्हणून यापुढे निवडणूक लढवायची का, असा काही निर्णय झालेला नाही, असे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Tax Slabआयकर मर्यादा