शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"पक्ष चालवणं शक्य नाही म्हणून शरद पवार लोकसभेनंतर..."; फडणवीसांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:16 IST

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

Devendra Fandavis on Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.  शरद पवार यांनी काँग्रेस आणि त्यांच्या संबंधांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही शरद पवार यांनी मोठे विधान केलं आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत शरद पवारांनी हे विधान केले. त्यामुळे आता शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर बोलताना पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं शरद पवार यांच्या डोक्यात असेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यापूर्वीही त्यांनी अनेक पक्ष बनवले आणि विलीन केले असेही फडणवीस म्हणाले.

"त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे त्यांच्या डोक्यात असेल. तर यामध्ये काही नवल नाही. यापूर्वी देखील शरद पवार यांनी अनेकवेळा पक्ष तयार केला आणि ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी आता संकेत दिलाय की, आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही. त्यामुळे शरद पवार त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन करतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"याचं उत्तर शरद पवारच देऊ शकतील. कारण आता लोकसभा निवडणूक आहे आणि दोन तीन महिन्यांवरच विधानसभा निवडणूक आहे. शाहू फुले आंबडेकरांच्या विचारांचे पक्ष इंडिया आघाडीमध्ये एकत्र आहेत," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांच्या विधानावर दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

पुढील २ वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामूहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे आणि ते पचवणे कठीण आहे असंही शरद पवार म्हणालेत.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेcongressकाँग्रेस