शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शरद पवारांनी अर्ध्या तासात उभारला साडेसहा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:37 AM

ग्रामस्थांशी चर्चा करताना निधी कमी पडत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले होते.

दहिवडी (जि. सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांच्या दौऱ्यात राजकीय सहकारी अन् तीन कंपन्यांना फोन करुन जलसंधारणाच्या कामांसाठी केवळ अर्ध्या तासात तब्बल साडेसहा कोटींचा निधी जमविला.त्यांच्यासोबत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार प्रभाकर घार्गे होते. त्यांनी नरवणे, वाघमोडेवाडी, मांडवे गावांना भेटी देऊन जलसंधारण कामांची पाहणी केली.ग्रामस्थांशी चर्चा करताना निधी कमी पडत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले होते. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फोन करून बँकेतर्फे कामासाठी मदत करण्याविषयी पवारांनी सांगितले. शिवेंद्रसिंहराजे यांनी तत्काळ एक कोटींची मदत करण्याची ग्वाही दिली. नंतर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही पवार यांच्या सूचनेवरून दीड कोटींचा निधी देण्याचे मान्य केले.मुंबई व पुण्यातील उद्योग जगतातील काहींना मदत करण्याची पवार यांनी विनंती केली. त्यांनीही तत्काळ दोन कोटींची मदत करण्याचे मान्य केले. अर्ध्या तासाचा प्रवास संपेपर्यंत पवार यांनी तब्बल साडेसहा कोटींचा निधी जमविला. त्यानंतर लोधवडे येथे प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी गेल्यावर हा निधी देण्याचे जाहीर केले.दुष्काळी जनतेला दिलासाश्रमदानातून राज्यात आदर्शवत ठरेल, असे जलसंधारणाचे काम करून दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच. जमा निधी तत्काळ गावागावात पोहोचवावा. त्या निधीतून डिझेल व यांत्रिकीकरणाचे काम करावे. आणखी जेवढी मदत देता येईल ती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत पवारांनी माण, खटावच्या जनतेला दिलासा दिला.सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक : १ कोटीसातारा जिल्हा परिषद : दीड कोटीसातारा जिल्हा नियोजन समिती : १ कोटीशरद पवार यांच्या खासदार निधीतून : ५० लाखवंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून : ५० लाखमुंबई, पुणे येथील काही उद्योजक : २ कोटी

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार