शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी शब्द पाळला; बारामतीहून पुणे वेधशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी पाठवली ५० किलो साखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:58 IST

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होतेहवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठविली आहे.

पुणे, दि. 23- हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठा पाऊस झाला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होते. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याने शरद पवार यांनी बोलल्याप्रमाणे बुधवारी ५० किलो साखर पुणे वेधशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाठवली आहे. आज दुपारी ४ वाजता अंकुश काकडे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामतीहून आलेली साखर हवामान खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देणार आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस न झाल्याने त्याच्यावर मोठी टीका होत होती. एका शेतकऱ्याने तशी तक्रारही पोलीस ठाण्यात केली होती. हवामान विभागाने गेल्या आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवस संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यावर शरद पवार यांनी हा अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर हवामान तज्ञांच्या तोंडात घालेन असं म्हंटलं होतं. 

20 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली होती. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकला होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली होती. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी लगावला होता. 

कर्जमाफीच्या धोरणावरही केली होती टीकाराज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही, असं शरद पवार म्हणाले होते. मान्सून लांबला आहे. परिणामी राज्याच्या काही भागात दुबार पेरणीची वेळ असून, ते आर्थिकदृष्ट्या संकटच आहे. शेतकरी सध्या या संकटातून जात आहेत. मलाही या सगळ्या गोष्टींची भयंकर काळजी होती, परंतु हवामान क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात चांगला पाऊस पडेल. ते खरे ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे, असं शरद पवार त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.तसंच, कर्जमाफीत शेतक-यांनी कर्जमाफ झालं आहे, असं पत्र बँकेत दिलं आहे, असं मला कुठेही दिसलं नाही, अशीही टीका त्यांनी केली. युवा पिढी शेतीपासून दूर झाली तर देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल. आज युवापिढी शेती सोडून राजकारणात अधिक रस घ्यायला लागला आहे. युवकांना विचारल्यावर जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारांपर्यंत स्वप्न रंगवले जातात. ही बाब आक्षेपार्ह नसली तरी अर्थकारणावर मोठे परिणाम करणारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.