शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:09 IST

Uddhav Thackeray Raj Thackeray: गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना हवा मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत यादृष्टीने राजकीय विधाने झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कविर्तक लावले जात आहेत.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray: ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चांचा पुन्हा एकदा धुरळा उडताना दिसत आहे. शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाने या चर्चेला जास्त हवा दिली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाभोवती चर्चांनी फेर धरला आहे. मनसे-शिवसेनेच्या युतीच्या चर्चा होत असताना शरद पवारांनी दोन्ही नेत्यांबद्दल मत मांडलं आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टीव्ही ९ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. पत्रकारांशी चर्चा करताना शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय नेतृत्वाबद्दल भाष्य केले. दोन्ही नेते एकत्र येण्याबद्दल बोलणं टाळताना शरद पवारांनी त्यांच्या नेतृत्व गुणांवर मत मांडले. 

उद्धव ठाकरे, राज ठाकरेंबद्दल पवार काय बोलले?

या गप्पांवेळी शरद पवार म्हणाले की, 'आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते. पण, मते मिळत नाहीत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते.'

मविआ एकत्र निवडणूक लढवणार?

राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांचे नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत करुन काम करताना दिसत आहे. या निवडणुका महायुती एकत्र लढणार की, स्वबळावर हे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. 

वाचा >>राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

दरम्यान, शरद पवारांनी महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात अशी भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी गप्पा मारताना शरद पवार म्हणाले, 'माझी इच्छा आहे की, महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात.'

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना