शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी शरद पवारांनी दिला संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 00:07 IST

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करणाऱ्या संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी संभाजीराजेंच्या विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.

मुंबई/नांदेड - राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारकीची मुदत संपुष्टात आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याती तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी  मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करणाऱ्या संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी संभाजीराजेंच्या विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.

शरद पवार म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीतील निकाल हे त्या त्या पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून असतात. आम्ही या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चर्चा केलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अरिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ. शिवसेनेकडेही काही अतिरिक्त मतं आहेत. काँग्रेसकडेही संख्याबळ आहे. अशाप्रकारे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याव्यतिरिक्तची अतिरिक्त मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.

सध्याचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे विजयी उमेदवारांना लागणारी मतं वगळता २७ मते अतिरिक्त आहेत. त्याशिवाय काही अपक्षांचीही मते महाविकास आघाडीकडे आहेत. अशा प्रकारे सर्व मतांची गोळाबेरीज करून शरद पवार यांच्या पाठिंब्यामुळे संभाजीराजे राज्यसभेवर सहज जाऊ शकतात. एकूण सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत मविआ ३ आणि भाजपाचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. आता भाजपाने तिसरा उमेदवार दिल्यास या निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते. तर मविआने तीन आणि भाजपने दोनच उमेदवार दिले तर मात्र संभाजीराजे सहजपणे राज्यसभेवर निवडून जातील.     

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीSharad Pawarशरद पवारRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक