शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 21:16 IST

बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते शरद पवारांनी केला आहे. ते बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरे घेत असलेल्या मुलाखतीत बोलत होते.

पुणे- बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते शरद पवारांनी केला आहे. ते बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरे घेत असलेल्या मुलाखतीत बोलत होते. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई स्वतंत्र करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे का ?, असा प्रश्न राज ठाकरेंनी यांनी विचारला असता, पवारांनीही त्याला दिलखुलास उत्तर दिलं आहे.अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईची गर्दी वाढणार आहे. इथून अहमदाबादमध्ये कोणी जाणार नाही, पण तिथूनच लोक मुंबईत येतील. बुलेट ट्रेनच्या माध्यमातूनच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, असंही पवार म्हणाले आहेत.राज ठाकरे यांनी विचारलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, बुलेट ट्रेनने मुंबईहून अहमदाबादला कोणी जाणार नाही, तर अहमदाबादहून मुंबईला येईल. त्यामुळे मुंबईची गर्दी वाढेल. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुंबई गमाविल्याचे दु:ख काहींच्या मनात आहे. वसई- विरारच्या पट्यात मोठ्या प्रमाणावर गुजरातीचे आक्रमण वाढत आहे. आता गुजराती पाय्याही दिसू लागल्या आहेत. काही राज्यातून लोक कष्ट करण्यासाठी येथे येतात. पण त्यांना अर्थकारणावर कब्जासाठी येथे यायचे आहे. त्यासाठी मुंबई- पुणे ही अत्यंत योग्य भूमी आहे. यासाठी आपल्याला जागृत राहावे लागेल. तुम्ही गप्प बसणार नाहीत, असेही पवार म्हणाले आहेत. पवारांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. राजकारणातल्या दोन पिढ्यांचा मेळ घालणारी ही मुलाखत ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात हा कार्यक्रम पडला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारामुळे 3 जानेवारीला नियोजित मुलाखतीचा हा कार्यक्रम रद्द केला होता. तो कार्यक्रम आज 21 फेब्रुवारीला पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात पार पडला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे