शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: "बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास मांडला, त्याचा आजही विरोध"-शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:33 IST

Sharad Pawar: "राज ठाकरे म्हणातात की, मी माझ्या भाषणात फक्त शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेतो. पण, मला त्यांचा अभिमान आहे."

मुंबई: काल मनसेच्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी(Raj Thackeray) शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तसेच, बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावरुनही राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्या टीकेला आज शरद पवारांनी(Sharad Pawar) प्रत्युत्तर दिले. "बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास दाखवला, त्याचा मी यापूर्वीही विरोध केला आणि आजही करतो," असे पवार म्हणाले.

"मी मागे एकदा पुरंदरेबद्दल बोललो होतो. पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात जिजामातेने महाराजांना घडवलं, हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी घडवल्याचं म्हटलं होतं. त्याला माझा सक्त विरोध आहे. महाराजांना जिजा मातेनेच घडवंल आहे. महाराजांच्या आयुष्यात सर्वात मोठं योगदान जिजामातेचे आहे. पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली, त्याला माझा विरोध आधीही होता आणि आताही आहे."

'जेम्स लेनला माहिती पुरवली'"दुसरी गोष्ट म्हणजे, जेम्स लेनेने त्याच्या पुस्तकात जे लिखाण केलं होतं, ते त्याने पुरंदरेंच्या माहितीच्या आधारे लिहील्याचं म्हटलं होतं. अतिशय घाणेरडं लिखाणं एखाद्या लेखकाने केले आणि त्याला माहिती पुरवण्याचे काम पुरंदरनी केले. त्यावर पुरंदरने कधीही स्पष्टीकरण दिले नाही. त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि मला त्याचा अभिमान आहे," असंही पवार म्हणाले.

'शाहु-फुले-आंबेडकरांचा अभिमान'पवार पुढे म्हणाले की, "राज ठाकरे म्हणातात की, मी माझ्या भाषणात फक्त शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेतो. पण, मला त्यांचा अभिमान आहे. या राज्यात शिवछत्रपतींचे सविस्तर वृत्त काव्यांच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सर्वात आधी लिहीले. शाहू,फुले, आंबेडकर यांना महाराजांबद्दल खूप आस्था होती. महाराजांचा आदर्श घेऊन सत्तेचा वापर कसा करावा, याचा विचार तिन्ही पक्षांनी केला आणि त्यातूनच महाराजांच्या विचाराची मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं पवार म्हणाले.

संबंधित बातमी-  "राज ठाकरेंना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही"; शरद पवारांचे प्रत्युत्तर

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे