शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:31 IST

आगामी निवडणुकांसाठी आघाडीची ३० जूनला बैठक 

सातारा : देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आघाडीची बैठक ३० जूनला होईल. त्यामध्ये एकत्रित निर्णय घेऊ, अशी माहितीही त्यांनी दिली.सातारा येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेतील बैठकीसाठी पवार हे सातारा दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, हिंदी विरोधापेक्षा प्रथम मी एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) पाहतो. कारण, एआयचे फायदे आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांनाही एआयचे शिक्षण मिळावं याची काळजी घेतली पाहिजे. एआयचा शेती, उद्योग, शिक्षणातही फायदे आहेत. त्यामुळे केंद्र शासनानेही एआयला मान्यता दिलीय. राज्य शासनानेही ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर एआयचा वापर व्हायलाच हवा. यामुळे शेतकऱ्यांवरील ओझेही कमी होईल. तसेच रयत शिक्षण संस्थेनेही एआय वापरासाठी पुढाकार घेतला आहे. याचाही उपयोग होणारच आहे.राज्यातील शिक्षणात हिंदीला विरोध होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पवार यांनी प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, असा सल्ला शासनाला दिला. तर महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे पदाधिकारी स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत, असा प्रश्नही पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी निवडणुकीबाबत आघाडीत चर्चा होणार आहे. बैठकीत निर्णय घेणार आहोत, असे उत्तर देत अधिक बोलणे टाळले. तर इस्त्रायल-इराण युध्दाबाबतही त्यांनी भारताला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असे मत मांडले.

‘शक्तीपीठ’ काय ते समजून घेणार; नंतरच बोलेन !सातारचा दौरा करुन आपण कोल्हापूरला चालला आहात. सांगली-कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. यावर आपली भूमिका काय राहणार, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर शरद पवार यांनी, हा प्रकल्प काय ते समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का ?. तसेच राज्य शासनानेही याबाबत माहिती दिली तर तीही घेईन. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही आग्रह समजून घ्यावा लागेल. विरोधासाठी विरोध नको. याबाबत सर्व समजून घेतल्यानंतरच मी बोलेन, असे स्पष्ट केले.

आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही..देशात आणीबाणी लादल्याबद्दल भाजपने देशात आवाज उठवल्याचा प्रश्नही पत्रकारांनी उपस्थित केला. यावर पवार यांनी भाजपला शहाणपणाला सल्ला दिला. ते म्हणाले, आणीबाणीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची जाहीर माफी मागितली होती. पुन्हा आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही. आणीबाणीला विरोध केलेल्यांच्या हातातच आता देशाची सत्ता असून ही वस्तूस्थिती आहे, अशी आठवणही शरद पवार यांनी भाजपला करुन दिली.