शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:04 IST

Sharad Pawar News: कोण पक्षातून गेले, याची चिंता करू नका. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू, असा निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला.

Sharad Pawar News: राष्ट्रवादीत फूट पडेल, असे कधी वाटले नव्हते, कोण पक्षातून गेले, याची चिंता करू नका. सुरुवातीला आमची संख्या ६ होती, नंतर ती वाढली आणि ७२ वर गेली. जयंत पाटलांनी १० वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. विरोधी बाकावरही आपण प्रामाणिकपणे काम केले. सत्ता येते जाते, पण पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास आहे. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू, असा निर्धार शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही गट त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. एकीकडे काका-पुतण्या एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. 

२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...

महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी काम करत राहिले पाहिजे. हा पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पुढे आला आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम पक्षाने केले. पक्षाला मिळालेली प्रतिष्ठा कार्यकर्त्यांच्या कामामुळेच आ. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी संधी देणार असून, संधी दिली तर महिला कर्तृत्व दाखवतात. येणाऱ्या निवडणुकीत ५० टक्के महिलांना निवडून द्यावे, दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यातील महिलांनी केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. राष्ट्रहितात मी कधीच राजकारण आणत नाही. देशहितासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी नमूद केले.

दरम्यान, जनतेचा पाठिंबा मिळाला, २६ वर्षांपूर्वी आपण एकत्र येऊन पक्ष स्थापन केला. २६ वर्षे लोकांनी सेवेची संधी दिली, अनेकांना पक्षाने संधी दिली. कार्यकर्त्यांमुळे हा दिवस साजरा करण्याची संधी मिळत आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस