शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Shankarrao Kolhe: महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 09:40 IST

कोपरगाव विधानसभा मतदार संघातून सहा वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या काम पहिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा साईबाबा शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष शंकरराव गेनुजी कोल्हे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवारी (दि.१६ ) पहाटे ४.३० वाजता नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे २४ मार्च १९२९ रोजी झाला होता. येसगावचे सरपंच ते राज्याचे मंत्री या प्रवासात त्यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात अनेक पदावर यशस्वी रित्या काम केले आहे. १९७२मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले. ते  कोपरगाव विधानसभा मतदार संघातून सहा वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या काम पहिले. तसेच जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ असलेल्या श्री. साईंबाबा शिर्डी संस्थांनचे ते ९ वर्ष उपाध्यक्ष होते.

 कोल्हे यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात काम करीत असताना अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व संस्था आजही उर्जित अवस्थेत असून भरारी घेत आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबाना रोजगार देण्यात, हजारो विधार्थ्याना उच्चशिक्षित बनविण्यात, शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. माजी मंत्री कोल्हे हे अत्यंत शिस्तप्रिय होते. त्याच्या अभ्यासू व आक्रमक स्वभावामुळे त्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा होता. ते कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाण्याचे तत्कालीन अध्यक्षही होते. तर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष होते. स्व. कोल्हे यांच्या ७२ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीच्या झंजावाताचा अस्त झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ४.३० वाजता कोपरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.