ऑनलाइन लोकमत -
अहमदनगर. दि. ८ - शनिशिंगणापूरमधील शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश देणार असल्याचा मोठा निर्णय शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्तांनी घेतला आहे. शनी चौथ-यावर कोणालाही प्रवेशबंदी करणार नाही असं शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्तांची सांगितलं आहे. तसंच तृप्ती देसाई यांचीही अडवणूक केली जाणार नाही, त्या आल्या तर त्यांनाही प्रवेश दिला जाईल असं सांगितलं आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयामुळे स्त्री - पुरुष समानता येईल असं मत व्यक्त केलं आहे. तर याप्रकरणी न्यायालयात याचिका केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी देवस्थाननं नाराजीन निर्णय घेतला असून प्रवेशाबद्दल आनंद, पण कायद्याचं पालन होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. दरम्यान आज सकाळी शनी चौथ-यावर कुणालाही प्रवेश द्यायचा नाही ही देवस्थानची भूमिका झुगारुन पुरुष भक्तांनी आज चौथ-यावर प्रवेश करत शनिच्या शिळेला जलाभिषेक केला. देवस्थान व प्रशासन या ग्रामस्थांना अडवू शकले नाही.
Men enter sanctum, give offerings at Shani Shingnapur temple (Ahmednagar, Maharashtra) on occasion of Gudi Padva. pic.twitter.com/3SNw14xkmH— ANI (@ANI_news) April 8, 2016
#WATCH Male devotees break barricade and enter sanctum of Shani Shingnapur temple (Ahmednagar, Maharashtra)https://t.co/xzgk4xVAkm— ANI (@ANI_news) April 8, 2016