शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीए मराठीच्या अभ्यासक्रमात तरुणींबाबत लज्जास्पद कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:43 IST

परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी समाज दु:खीकविता वगळण्याची मुंबई विद्यापीठावर नामुष्कीसोशल मिडियावर नेटकऱ्यांमध्येही कवितेवर सुंदोपसुंद

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. एकीकडे मुलींवर अत्याचार वाढत असल्याचे चित्र असताना विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली. राज्यभरात याबाबत संताप निर्माण झालेला असताना यवतमाळात आदिवासी कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या पेपर सहामध्ये ‘महानगरीय जाणीवेचे साहित्य’ हा घटक अंतर्भूत आहे. या घटकात कवी दिनकर मनवर यांचा ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ हा कवितासंग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु, या संग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत आदिवासी समाजाच्या तरुणींबाबत अश्लील उल्लेख असल्याने आदिवासी संघटना संतप्त झाल्या आहेत. ‘काळं असावं पाणी कदाचित, पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं, किंवा आदिवासी पोरीच्या ...सारखं जांभळं’ या ओळींमध्ये आदिवासी महिला, मुलींविषयी लज्जास्पद उल्लेख आला. सकल आदिवासी समाजाचा अपमान करणारी ही ओळ असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप नोंदविला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ७०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील तसेच दूरशिक्षण विभागातील पदवीच्या विद्यार्थ्यांना ही कविता अभ्यासण्यासाठी देण्यात आली आहे. त्यातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आदिवासी तरुणींना भयंकर मानसिक त्रास भोगावा लागू शकतो.त्यामुळे ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी, अभ्यासक्रम निवड मंडळाने ही कविता कोणत्या निकषावर अभ्यासक्रमात घेतली याचा तपास केला जावा, अशी मागणी बिरसा क्रांती दल आणि गोंडवाणा गणतंत्र पार्टीने केली आहे. कवी दिनकर मनवर, अभ्यासक्रम निवड समिती व कवितासंग्रह छापणाऱ्या पॉप्युलर प्रकाशन यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.कविता वगळली, गुन्हे नोंदवाराज्यभरातून आदिवासी संघटनांनी आवाज उठविताच मुंबई विद्यापीठ सावध झाले. मराठी अभ्यास मंडळाचा तातडीने ठराव घेऊन संबंधित आक्षेपार्ह कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. या कवितेवर परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही, ही कविता कोणत्याही महाविद्यालयात शिकवू नये, असा आदेश विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव सुनिल भिरुड यांनी काढले. मात्र, संबंधित कवी, निवड समिती आणि प्रकाशकावर गुन्हे दाखल न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बिरसा क्रांतीदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी दिला आहे.सोशल मिडियावरही सुंदोपसुंदया कवितेवरून सोशल मिडियावर बरेच वादप्रतिवाद दररोज झडत आहेत. जुन्या प्रतिष्ठित कवींच्या कवितांचे दाखले दिले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र् याची परिमाणे तपासली जात आहेत. या सर्व चर्चेला कुठे विराम मिळतो तेच आता पाहणे बाकी आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षणliteratureसाहित्य