शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

शंभूदेवासाठी ५० टन भस्माची निर्मिती !

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

शिखर शिंगणापूरची मंगळवारपासून यात्रा : पूजेसाठी लागणारे साहित्य बनविण्यासाठी परिसरातील बचतगटांची लगबग--लोकमत विशेष...

शरद देवकुळे - पळशी --महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभूमहादेवाची यात्रा मंगळवार, दि. २४ पासून सुरू होत आहे. महादेवाच्या पूजेसाठी लागणारा भस्म आणि दावणा याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने यात्रेत या पूजा साहित्याची मोठी उलाढाल होते. सध्या परिसरात तीस ते चाळीस भट्ट्यांमधून सुमारे ५० टन भस्म तयार करण्यात आला आहे. शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिखर शिंगणापूर येथे हजेरी लावतात. दि. २४ ते दि. ४ एप्रिलअखेर होणाऱ्या यात्रेची तयारी सुरू झाली आहे. गावपरिसरात भस्म तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी लागणारा कच्चा माल सांगली जिल्ह्यातील जत येथून आणला जातो. भस्म तयार करण्यासाठी पांढरी खडी, नारळाचे केशर, सुगंधी तेल यांचा वापर केला जातो. सुरुवातीला खडी भट्टीमध्ये भाजून घेतली जाते. पावडर झाल्यानंतर त्यात पाणी मिसळून साच्याच्या साह्याने छोट्या वड्या तयार केल्या जातात. त्यानंतर कडक उन्हात त्या सुकविल्या जातात. अशी प्रक्रिया करून तयार झालेला भस्म शिंगणापूर यात्रेत विक्रीसाठी पाठविला जातो.शंभूमहादेवाच्या पूजेसाठी दावणाही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. सुगंधी दावण्याची शेती येथील शेतकरी करत असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेतातील दावणा काढून त्याच्या जुड्या बांधून सुकवून ठेवल्या जातात. भस्म आणि दावणा याची मोठी उलाढाल शिंगणापूर यात्रेत होत असते. दोन लाखांच्या भांडवलातून बचतगटांना वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता एक ते दीड लाखाचा नफा होतो. भस्म विक्रीतून लाखोची उलाढालशंभूमहादेवाच्या पूजेसाठी भस्म महत्त्वाचा मानला जातो. याचे धार्मिक महत्त्व जास्त असल्यामुळे परिसरात भस्मनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. परिसरात तीस ते चाळीस भस्म बनविण्याच्या भट्ट्या आहेत. या भट्ट्यांच्या माध्यमातून सुमारे ४० ते ५० टन भस्म तयार होतो. यात्राकाळात भस्म विक्रीतून सुमारे १८ ते २० लाखांची उलाढाल होते. येथील भस्म केमिकल विरहीत असल्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत नाही, असे व्यावसायिक सांगतात.औषधी दावण्याची शेतीशंभूमहादेवाला बेल, दावणा व भस्माची आवड असल्याने यात्रेत याची मोठी विक्री होते. दावणा हा आरोग्यदायी आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पित्तनाशक म्हणूनही याचा उपयोग केला जातो. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुमारे २० एकर क्षेत्रावर दवण्याचे उत्पादन घेतले जाते. हे पीक तीन महिन्यांचे असते. दवण्याची एक जुडी पाच रुपयांना विकली जाते. साधारणपणे एकरी ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.शासनाने अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिल्यास आम्ही चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करू शकतो. कच्चा माल, मजुरी, भांडवलाचा अभाव यामुळे अनेक अडचणी येतात.- बाळूबाई जाधव, अध्यक्षा, बचतगटअसा तयार होतो भस्मभस्म तयार करण्यासाठी जत येथून कच्चा माल आणला जातो. भस्माची खडी नारळाच्या केशरात भट्टीत भाजली जाते. त्यानंतर मजुरांकरवी ती बारीक वाटून घेतली जाते. तयार झालेली पावडर एक दिवस पाण्याच्या हौदात भिजत ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी खडे बाजूला काढून घट्ट पिठाच्या साच्याच्या साह्याने वड्या तयार केल्या जातात. या वड्या उन्हात चांगल्या वाळविल्या जातात. त्यानंतर चाळणीवर घासून योग्य आकार दिला जातो.