शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अजित पवार '६०२' ऐवजी सीताराम कुंटेंच्या दालनात बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:54 IST

कुंटे यांना काही काळासाठी दुसरे दालन मिळणार

- अतुल कुलकर्णी मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलनाचा देशात पहिला कायदा करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात सहाव्या मजल्यावरच्या दालनाने व आरोग्य मंत्रिपदाने शकुनाच्या गोष्टी सांगणे सुरू केले आहे. ज्या विधानभवनात कायदे केले जातात तेथे पहिल्या मजल्यावर एका सचिवांनी दोन-अडीच डझन देवांच्या तसबिरी ठेवल्या. या पार्श्वभूमीवर अपशकुनी ठरलेल्या ६०२ नंबरच्या दालनाऐवजी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे दालन मिळेल.तशा सूचना मंगळवारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, कुंटे यांना काही काळासाठी दुसरे दालन दिले जाईल. ही व्यवस्था अंमलात येईपर्यंत अजित पवार यांना पहिल्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपल्यामध्ये मुख्य सचिव बसतील. त्यामुळे गतीने कामकाज होईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार तसे दालन फक्त अतिरिक्त मुख्य सचिवांचेच आहे जे त्यांना दिले जाईल.सहाव्या मजल्यावरील ६०२ क्रमांकाचे दालन मंत्रिमंडळातील नंबर दोनच्या मंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना देतात. २१ जुलै २०१२ रोजी मंत्रालयात आग लागली. नूतनीकरणानंतर ते दालन उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना दिले. मात्र सिंचनाच्या टक्केवारीवरून त्यांच्यावर आरोप झाले व पुढे आघाडीचे सरकारही गेले. २०१४ साली भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर हेच दालन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दिले. त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. नंतर हे दालन चंद्रकांत पाटील यांना देण्याचा प्रस्ताव झाला, पण त्यांनी तो नाकारला. पुढे कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांना ते मिळाले. त्यांचे अकाली निधन झाले. नंतर या दालनाची विभागणी करून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना ते दिले. दोघेही २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. सार्वजनिक आरोग्य विभागही शकुन-अपशकुनात मागे नाही. भाई सावंत, बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, दौलतराव अहिर, जयप्रकाश मुंदडा, दिग्विजय खानविलकर, विजयकुमार गावित, विमल मुंदडा, राजेंद्र शिंगणे, सुरेश शेट्टी, डॉ. दीपक सावंत यांनी याआधी हा विभाग सांभाळला. मात्र प्रत्येकासाठी आरोग्यमंत्री पद शेवटचे ठरले. त्यानंतर ते निवडणुकीत हरले. राजेंद्र शिंगणे कसेबसे यावेळी निवडून आले. आता त्यांनाच पुन्हा हे खाते घ्यावे, असा आग्रह सुरू आहे. हे खातेदेखील लाभदायक नाही, अशी आख्यायिका आहे.दोन डझनपेक्षा जास्त देवदेवतांच्या तसबिरीज्या विधिमंडळाने देशात पहिला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे राज्य अशी ओळख महाराष्टÑाला दिली, त्याच विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सचिव मा. मू. काज यांनी एका दालनात दोन डझनपेक्षा जास्त देवदेवतांच्या तसबिरी आणून ठेवल्या आहेत. त्यावर सभापतींना नाराजी व्यक्त करूनही ते देव तेथेच आहेत. नव्या वर्षात हा शकुनाचा खेळ किती व कसा रंगणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार