शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

शाहिरी हरपली!

By admin | Updated: March 21, 2015 01:50 IST

संस्कृतीचं हे संचित जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि सामाजिक, राजकीय व्यंगांविरोधात बुलंद आवाज उठवणारे शाहीर साबळे यांच्या निधनाने मराठी लोकसंस्कृतीचा आधारस्तंभ हरपला आहे.

शहरीकरणाच्या धबडग्यात लुप्त होत चाललेल्या लोककलेचं आयुष्यभर जतन करणारे, संस्कृतीचं हे संचित जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि सामाजिक, राजकीय व्यंगांविरोधात बुलंद आवाज उठवणारे शाहीर साबळे यांच्या निधनाने मराठी लोकसंस्कृतीचा आधारस्तंभ हरपला आहे. गर्जा महाराष्ट्र माझा, तुळस वंदावी, वासुदेव आला, विंचू चावला अशी अनेक लोकगीते ज्यांनी अजरामर केली अशा शाहिराला मानाचा मुजरा!1945 ते १९७५ हा शाहीर साबळे यांच्या दृष्टीने सर्वाधिक निर्मितीक्षम कालखंड ठरला. इंद्राच्या दरबारात तमासगीर (१९४५), नारदाचा रिपोर्ट (१९५१), चित्रगुप्ताच्या दरबारात दारुड्या (१९५२), कोड्याची करामत (१९५३), कोयना स्वयंवर (१९५४), नशीब फुटके सांधून घ्या (१९५५), यमाच्या राज्यात एक रात्र (१९६०), ग्यानबाची मेख (१९६२), मीच तो बादशहा (१९६३), आबुरावचे लगीन (१९६३), आंधळं दळतंय (१९६७), असुनी खास मालक घरचा (१९६८), बापाचा बाप (१९७२), कशी काय वाट चुकला (१९७३) ही त्यांची गाजलेली मुक्तनाट्ये आणि वगनाट्ये होत. त्यांच्या नाट्यामधून कधी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कधी शोषणाविरुद्ध आवाज, कधी दैववादावर प्रहार तर कधी रिकामटेकडेपणावर मार्मिक भाष्य आढळून येते.जय जय महाराष्ट्र माझा : महाराष्ट्रगीत प्रथम घुमले सोलापुरात. शाहीर साबळे यांना ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकरांचीही शाबासकी लाभली. शाहीर सिद्धराम बसाप्पा मुचाटे, शाहीर शंकरराव निकम यांच्या कवनांनी साबळे यांना भुरळ घातली होती. शनिवारवाड्यावर शाहीर निकमांचा कार्यक्रम सुरू असताना ‘स्वराज्य दारी आले, आणा दीपक ज्योती’ हे गाणे म्हणण्याची संधी साबळे यांना मिळाली आणि तेथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत सोलापूरला झालेल्या शेतकरी मेळाव्यात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत शाहिरांच्या मुखातून प्रथम बाहेर पडले आणि ते ‘महाराष्ट्र शाहीर’ झाले.पुरस्कार : संगीत नाटक अकादमी १९८४, शाहीर अमर शेख पुरस्कार १९८८, महाराष्ट्र गौरव पुरस्कार १९९०, पद्मश्री १९८८1990मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ७०व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषविले होते. असा घडला लढवय्या शाहीर!आपल्या बुलंद आवाजाने अनेक कार्यक्रम गाजवणारे कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांना लोककलेचे बाळकडू मिळाले, ते त्यांच्या घरातून. सातारा जिल्ह्यातील पसरणीत (तालुका वाई) एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील माळकरी, वारकरी पंथाचे! ते भजन आणि कीर्तन करत. साबळे यांना बालवयातच बासरीवादनाचाही छंद जडला. त्यांनी शाळा सोडली. अमळनेरला त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींसोबत ते दौरे करू लागले. आपल्या शाहिरीतून राजकीय - सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करू लागले. त्यांनी ‘जागृती शाहीर मंडळ’ काढले. धुळ्याचे शाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे यांचा आदर्श त्यांनी स्वत:समोर ठेवला होता. पुढे १९४२ साली ते शाहीर शंकरराव निकम यांच्या संपर्कात आले. निकमांकडूनच त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. आंदोलने... लढे1 हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी प्रचाराचे रान उठवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद?’ (१९४७) हा पहिला पोवाडा लिहिला. स्वतंत्र भारतात नव्याने सुरू झालेल्या राजकारणाचा संदर्भ या पोवाड्याला होता. त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा म्हणजे ‘आधुनिक मानवाची कहाणी!’ त्यात त्यांनी साम्यवादाचा विचार मांडला. 2स्वातंत्र्योत्तर काळात पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा, म्हणून साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण आरंभिले होते. त्या वेळी शाहिरांनी आपल्या पथकासह या मंदिरप्रवेशासाठी महाराष्ट्रभर प्रचार करून अनुकूल वातावरण निर्माण केले. 3संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलनातही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत शाहिरांनी गायिले. या गाण्याने त्यांना अमाप कीर्ती लाभली. शाहीर आणि शिवसेनामहाराष्ट्र राज्यात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासह जनजागृतीसाठी दौरे केले; तसेच ‘आंधळं दळतंय’ हे मुक्तनाट्य लिहून रंगभूमीवर आणले. त्यातून शिवसेनेच्या निर्मितीला प्रेरणा मिळाली. आरंभापासून शाहीर शिवसेनेसोबत होते; पण या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यावर शाहीर त्या संघटनेपासून दूर झाले. कौटुंबिक जीवन१९४८मध्ये भानुमती बारसोडे या सुविद्य युवतीशी त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. त्या चांगल्या कवयित्री असल्यामुळे त्यांची शाहिरांना उत्तम साथ मिळाली; मात्र हा विवाह टिकला नाही. शाहिरांचे कुटुंब हे कलावंतांचे कुटुंब आहे. महाराष्ट्राची लोकधाराशाहिरांनी एकूण १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या त्यांच्या नावीन्यपूर्ण, सर्जनशील कार्यक्रमातून; अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते इत्यादींच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. ‘यमराज्यात एक रात्र’ हे त्यांचे १९६० मध्ये नाट्यगृहात सादर झालेले पहिले मराठी मुक्तनाट्य होय. त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोकगीते गोळा करून त्यांचे पुनरुज्जीवन केले. मोबाइल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील एकमेवाद्वितीय प्रयोगही त्यांनी केला.‘शाहीर’ पदवी बहाल होण्याआधीच साबळे एकदा कॉमे्रड श्रीपाद अमृत डांगे यांना भेटायला आले होते. नुकतीच गायकी सुरू केलेल्या साबळे यांनी वडिलांना (डांगे यांना) पोवाडा, कवने म्हणून दाखविली होती. चाळीसच्या दशकात दादरच्या ‘शहा निवास’मध्ये काही मुलांसह शाहीर आमच्या घरी आले. त्यांच्या पोवाड्यांचा दीड तासाचा कार्यक्रम रंगला. त्यांची गायकी ऐकून डांगे यांनी पहिल्यांदाच साबळे यांना ‘शाहीर’ म्हणून संबोधले. शाहीर साबळे यांच्या निधनाने आज महाराष्ट्र शाहिरीला मुकला आहे. - रोझा देशपांडे, शाहीर साबळे यांच्या स्नेहीशाहीर साबळे यांच्या निधनाने ‘महाराष्ट्राची लोकधारा’तून मराठी लोकसंस्कृतीच्या प्रसारासाठी झटणारा निष्ठावंत हरपला. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य चळवळीसोबतच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. महाराष्ट्राची लोकधाराच्या माध्यमातून त्यांनी मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविले. लुप्त होत चाललेल्या मराठी लोकगीतांचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या निधनाने शाहिरी परंपरेचा निष्ठेने पुरस्कार करणारा लोकशाहीर गमावला आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीजनसामान्यांच्या मनात कशी जागा मिळवायची याचे मार्गदर्शन शाहिरांनी केले. लोककलावंतांची तळमळ जाणून घेऊन त्यांच्यासाठी झटत राहिले. संपूर्ण आयुष्य त्यांनी लोककलेसाठी व्यतीत केले. वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.- अशोक हांडे, दिग्दर्शकमहाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा बुलंद आवाज म्हणजे शाहीर साबळे. त्यांच्या निधनामुळे राज्याची सांस्कृतिक लोकधारा अथपासून इतिपर्यंत माहीत असलेला लोकशाहीर हरपला. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्रीमराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटकाची बस प्रथम शाहीर साबळेंची आली. त्यानंतर प्रथा पडली. खड्या आवाजाचे त्यांना वरदान होते. वसंत देसाई त्यांच्या कार्यक्र मात महाराष्ट्र गीत गाण्यासाठी त्यांनाच बोलवायचे. लोकनाट्याचे ते अभ्यासक होते. - फैय्याज, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शाहीर साबळे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या अजरामर पोवाड्याने कायम स्मरणात राहतील. कलेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देणारे ते सेनानी होते. - खा. अशोक चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमहाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरू करून त्यांनी आमची पिढी घडवली. शाबासकीची थाप देत, ‘आजोबापण’ जपले. आज पोरके झाल्याची भावना आहे.- आदेश बांदेकर, अभिनेताशाहिरांनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवरून प्रदर्शित करून प्रत्येक घरात पोहोचवला. विंचू चावला, आली आली गं भागाबाई यांसारखी सुप्रसिद्ध लोकगीते आठवली की, शाहीर आठवल्याशिवाय राहत नाहीत. शाहीर साबळे यांच्यानंतर देवदत्त साबळे आणि केदार शिंदे यांनी पुन्हा नव्याने महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरू ठेवावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.- कौशल इनामदार, संगीतकार शाहीर साबळे हे लोककलेतील दैवत होते. त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा अभिमान आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकधारेतून आमच्यासारख्या तरुणांना संधी दिली. - भरत जाधव, अभिनेताशाहिरांच्या शाहिरीवर चळवळीचा पगडा होता. त्यांचे कार्य म्हणावे तसे प्रकाशझोतात आले नाही. शाहिरीचे विद्यापीठच गमावल्याची भावना मनात आहे. ऐरोलीत माथाडींच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली असता, त्यांनी ‘शाहिरीचा वारसा पुढे नेत आहात याचा अभिमान आहे’ असे म्हटले होते. ती माझ्यासाठी खरी शाबासकी ठरली. - संभाजी भगत, शाहीर‘वस्त्रहरण’चा मुहूर्ताचा नारळ शाहीर साबळे यांनी फोडला होता. हे नाटक मोठे यश मिळवेल, असे भाकीत वर्तवले होते. ते तंतोतंत खरे ठरले. - गंगाराम गवाणकर, नाटककार व ज्येष्ठ रंगकर्मी