शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी 'सामना'तील 'मोस्ट वॉन्टेड'च्या घराची केली तोडफोड, शिवसेनेविरोधात केली होती पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 17:46 IST

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खुश शहा या तरूणाच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.  शहापूर येथील खुश शहा या गुजराती तरुणाने सोशल मीडियावर संजय राऊत व मराठी बांधवांबद्धल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट केली होती.

शहापूर, दि. 24 - ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खुश शहा या तरूणाच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.  शहापूर येथील खुश शहा या गुजराती तरुणाने सोशल मीडियावर संजय राऊत व मराठी बांधवांबद्धल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट केली होती. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी शहाच्या शहापूर येथील घराची तोडफोड केली. 

नुकत्याच पार पडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या एकहाती विजयावर तिखट प्रतिक्रीया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही निवडणूक भाजपाने 'मनी आणि मूनी ' यांच्या जोरावर जिंकल्याचा आरोप केला होता.  गुजराती समाजात असंतोष पसरल्याचे वातावरण निर्माण झाले असताना खुश शहाच्या घराची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 

आज शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त देखील मोस्ट वॉन्टेड या मथळ्याखाली हा खुश शहा कुठे कुणालाही दिसल्यास सामनाच्या कार्यालयास कळविण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी दुपारी १२ . ४० वाजताच्या दरम्यान अचानक जमा झालेल्या शिवसैनिक शहाच्या घरावर हल्लाबोल केला. मुंबई आणि ठाण्यातूनही आज काही शिवसैनिक शहापूरमध्ये दाखल झाले होते. मराठी द्वेषाचे कारणही विचारण्याचा प्रयत्न केला ; परंतू स्वतः खुश शहा हा घरात आढळून आला नाही. शिवसैनिकांच्या हल्ल्यात शहाच्या घराचे नुकसान झाले असून काही शिवसैनिकांविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान, संजय राऊत आणि मराठी माणसाबद्धल अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या खुश शहा याच्याविरुद्ध मुंबईतील सायबर सेल गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जैन मुनींवर राग काढण्यापेक्षा लोकांनी का नाकारले याचा विचार करा, माधव भंडारी यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर-

राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे,असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी दिले.सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्या आदरणीय मुनींवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तुलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे, अशा शब्दांमध्ये भंडारींनी शिवसेनेवर टीका केली.त्यांनी सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या प्रत्येक महापालिका, नगरपालिका,जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आहे. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पुनःपुन्हा पसंती दिल्यामुळे भाजपाला यश मिळत आहे. ही शिवसेनेची खरी पोटदुखी आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आपल्याला थोडेसेच यश मिळाले आणि भाजपाला मात्र लोकांनी संपूर्ण यश दिले याबद्दल शिवसेनेला वाईट वाटणे आश्चर्यकारक आहे. उगाच जैन मुनींवर आगपाखड करून जनादेशाचा अपमान करण्यापेक्षा जनतेचा आदर केला तर शिवसेनेचे राजकारणात काही तरी स्थान उरेल, असा टोला त्यांनी हाणला.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेना