शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Shahajibapu Patil : "आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा, पुन्हा पक्षात कशाला बोलवता?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:02 IST

Shahajibapu Patil slams Shivsena Aaditya Thackeray : शिंदेसमर्थक आमदार शहाजीबापू पाटलांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) हे बंडखोर आमदारांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. बंडखोरांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसल्याने दुःख वाटत आहे. राजीनामा देण्याची कोणाची हिंमत नाही. हे गद्दार आहेत अन् ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. यानंतर आता शिंदेसमर्थक आमदार शहाजीबापू पाटलांनी (Shahajibapu Patil) आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवता?" असा खोचक सवाल शहाजीबापू पाटील यांनी विचारला आहे. "आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत. सातत्याने आम्हाला गद्दार, गद्दार म्हणताहेत, गटार आहे वाहून जाऊ द्या म्हणत आहेत. मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गद्दार आहोत, गटाराची घाण आहोत तर मग आम्हाला पक्षात पुन्हा, पुन्हा बोलवताय कशाला?" असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस, गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही"

"शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस, गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही" असं म्हणत शिवसेनेने निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shivsena Vinayak Raut) यांनी शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस. एकदा आपटी खाल्ली, पुन्हा शिवसेनेने आधार दिला म्हणून आमदार झाले. आता नशिबातली ही शेवटची आमदारकी आहे. पांडुरंगाच्या पंढरीमध्ये राहून सुद्धा संत तुकारामही त्यांना कळले नाही. शहाजीबापूंनी गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही" असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आता आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. त्यामुळे, यापुढील निवडणुकांवर आमच्याकडून उद्धव ठाकरेंचा फोटो बॅनरवर लावला जाणार नाही, एकनाथ शिंदेंचा लावला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच, आदित्य ठाकरेंच्या सुरू असलेल्या सभा आणि त्यांच्या भाषणावर बोलतानाही त्यांनी आदित्य यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची कॉपी करू नये, बाळासाहेबांनाच ती ठाकरी भाषा शोभत होती, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ती भाषा शोभत नाही, असेही पाटील यांनी म्हटले.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण