पंकज रोडेकर / ठाणे कोट्यवधी रुपयांच्या बोगस कॉल सेंटर घोटाळ्यातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगीची न्यायालयीन कोठडी अंडा सेलमध्ये झाली आहे. सुरक्षिततेचे कारण देऊन त्याला तेथे ठेवले आहे. मात्र, या अंडा सेलमध्ये प्रामुख्याने दहशतवादी, खतरनाक किंवा व्हीआयपी गुन्ह्यातील आरोपींना ठेवले जात असल्याने तोही आता व्हीआयपी आरोपी झाल्याचे बोलले जाते. याबाबत, ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनानेही त्याला अंडा सेलमध्ये ठेवल्याबाबत दुजोरा दिला आहे.अटक झाल्यावर शॅगीने पहिल्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयात आपणास न्यायालयीन कोठडी न देता पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती. याचदरम्यान, तीन कॉल सेंटरप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याप्रकरणी त्याची चौकशी पूर्ण केली आहे. ती पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर अखेर पुन्हा पोलीस न कोठडीत जाण्यासाठी घाबरलेल्या शॅगीची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. याचदरम्यान, त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला इतर कैद्यांपासून वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. परंतु, हे ठिकाण व्हीआयपी किंवा दहशतवादी तसेच खतरनाक असलेल्या गुन्हेगारांना ठेवण्याचे असलेले ठिकाण आहे. त्या सेलमध्येच आता त्याची न्यायालयीन कोठडी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शॅगीची न्यायालयीन कोठडी ‘अंडा सेल’मध्ये
By admin | Updated: April 29, 2017 02:50 IST