शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लिंगबदल केलेल्या ललितच्या लग्नाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:48 AM

परीक्षा संपली, आता वेळ निकालाची; पोलीस नाईक ललित व सीमा साळवेशी थेट संवाद

- सोमनाथ खताळ/पुरुषोत्तम करवाबीड : लिंगबदल करून ललिताचा ललितकुमार झाला. गेल्या आठवड्यात औरंगाबादच्या मुलीसोबत तो विवाहाच्या बंधनात अडकला. आता पुढे काय, या समाजमनात निर्माण झालेल्या प्रश्नावर ललितकुमार म्हणाला, ‘चार वर्षे संघर्ष केला. मोठी सत्त्वपरीक्षा होती ती. लिंगबदलाची परीक्षा दिली. पास झालो. लग्नही झाले. आता वेळ आहे सुखी संसाराबरोबरच बाप बनून निकाल देण्याची.’लिंगबदल केलेला ललितकुमार आणि त्याची पत्नी सीमा या दाम्पत्याने ‘लोकमत’ला त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली. माजलगाव तालुक्यातील राजेगावचा रहिवासी असलेला ललित साळवे २०१० साली बीड पोलीस दलात महिला म्हणून भरती झाला. त्यावेळी रेकॉर्डला त्याचे नाव ललिता असे होते. २०१५ पासून त्याला स्वत:च्या शरीरात हार्माेन्समध्ये बदल जाणवू लागला. त्यामुळे बाहेरून स्त्री आणि आतून पुरुष ही घुसमट त्याला त्रास देऊ लागली. अखेर २०१७ साली तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे त्याने लिंगबदलासाठी अर्ज केला. परवानगी आणि शस्त्रक्रिया करण्यात तीन वर्षांचा काळ गेला. २०१८ मध्ये एक व २०१९ मध्ये दोन अशा तीन शस्त्रक्रिया करून ललिताचा ललितकुमार झाला. राज्य सरकारनेही त्याला पोलीस दलात पुरुष म्हणून स्वीकारले. सध्या तो पोलीस शिपाई आहे.ललितकुमारची पत्नी सीमा ही मूळची औरंगाबादची. शिक्षण बी.ए. तृतीय वर्ष. ललितची पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हाच त्याचा भाऊ बाळासाहेब यांच्या सासू-सासऱ्यांनी सीमाकडे मागणी घातली; परंतु मुलीबरोबर कसे लग्न करणार, असे म्हणत सीमाने नकार दिला. चार महिन्यांपूर्वी सीमा एका कार्यक्रमासाठी माजलगावला आली. याच कार्यक्रमात सीमाने ललितला पारखून पाहिले. त्यावेळी त्याच्या सर्व शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. खरेतर याच कार्यक्रमात ती ललितच्या प्रेमात पडली. पुन्हा एकदा आईने विचारले तेव्हा सीमाने काहीसा वेळ मागितला.अखेर ‘व्हॅलेंटाईन डे’नंतर तिसºया दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारीला औरंगाबादेत दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही ललितच्या राजेगाव या मूळगावी आले. रात्रीचे १२ वाजलेले होते, तरी ग्रामस्थ या दोघांची वाट पाहत होते. सर्वांनाच कुतूहल होते. दुसºया दिवशी गडंगण, चहा-पाण्यासाठी अनेकांचे बोलावणे येऊ लागले. हा क्षण या नवदाम्पत्याला खूप सुखावणारा होता. गावकऱ्यांनी हे लग्न स्वीकारले, याची पावती देणारा होता.लग्नानंतर माजलगाव धरण परिसरात सैरलग्न होताच ललित व सीमा दाम्पत्याने माजलगाव धरण परिसराची सैर केली. एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालविल्यानंतर सीमा माहेरी गेली. आता २३ फेब्रुवारी रोजी राजेगावातच स्वागत समारंभ होणार आहे. सुट्टी मिळाली, तर हनीमून ठरवू, असे ललित म्हणाला.युट्यूब, बातम्या पाहून केला अभ्यासचार महिने युट्यूब, बातम्या, व्हिडीओ आदी माध्यमांतून सीमाने लिंगबदलानंतरचे आयुष्य या विषयावर अभ्यास केला. त्यानंतर, तिने लग्नास होकार दिला. ‘आपला जीवनसाथी निवडण्यासाठी प्रत्येक जण असेच करीत असतो,’ असे सीमा सांगत होती.जीवनात ही घडी...शस्त्रक्रियेनंतर मला चार स्थळे आली, पण कुठे मुलीचे शिक्षण, तर कुठे तिचे दिसणे यामुळे मी ते नाकारले. पहिल्या भेटीतच मला सीमा आवडली. माझे जीवन खरोखरच संघर्षाचे राहिले आहे. आता हा संघर्ष संपला आहे. सीमाच्या रूपाने मला साथीदार मिळाला आहे. सुखाने संसार करून चांगले जीवन जगण्याची इच्छा आहे. - ललितकुमार साळवेचांगली नोकरी आणि दिसायलाही देखणा, यामुळे पहिल्याच भेटीत मी ललित यांच्या प्रेमात पडले. लग्नानंतर समाज काय म्हणेल, याची चिंता मी केली नाही. लग्नानंतर मी खूप खूश आहे.- सीमा साळवे