शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; बंगळुरूच्या डॉक्टरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:04 IST

लग्नाचे आमिष दाखवून येथील एका ख्यातनाम महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बंगळुरू येथील डॉक्टरवर करवीर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. संशयित डॉ. आकाश महादेव आवटी (रा. आवटी बिल्डिंग, गुलबर्गा) असे त्याचे नाव आहे.

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून येथील एका ख्यातनाम महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बंगळुरू येथील डॉक्टरवर करवीर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. संशयित डॉ. आकाश महादेव आवटी (रा. आवटी बिल्डिंग, गुलबर्गा) असे त्याचे नाव आहे.संशयित डॉक्टरने गोव्यातील हॉटेल आणि बंगळुरू येथील रूमवर नेऊन अत्याचार करून मोबाईलवर शूटिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पीडित महिला खेळाडूने तक्रारीत नमूद केले आहे.सांगलीतील वधू-वर सूचक एजंटने पीडित महिलेची संशयित डॉ. आकाश आवटी याच्याशी ओळख करून दिली. दोघांची मने जुळल्याने डॉ. आवटी याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. ३१ डिसेंबर २०१६ रोजी गोव्यात नेले. तेथे जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर गोव्यातूनच तो २ जानेवारीला बंगळुरूला निघून गेला. पीडित स्वत:हून कोल्हापूरला आली. त्यानंतर ती त्याला बंगळुरूला भेटायलाजात होती. तेथील रूमवरही त्याने लैंगिक अत्याचार केला. लग्नाचा विषय काढल्यावर ‘तू काळजी करू नकोस आपल्याला लग्न करायचे आहे,’ असे म्हणत त्याने फेब्रुवारी २०१८ पर्यंत टाळाटाळ केली. ‘मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरले आहे. तू आता माझ्या आयुष्यात राहू नकोस, पुन्हा लग्नाचा विषय काढलास तर तुझे व्हीडिओ आणि फोटो व्हायरल करून ठार करेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयित आवटीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला रवाना झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर