शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
4
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

प्रोपरायटरी व्यवसायाचे सात प्रमुख तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 4:21 AM

व्यवसायाची सुरुवात करण्याचा ‘एकल स्वायत्त’ म्हणजेच ‘प्रोपरायटरी कन्सर्न’ हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक मार्ग जरी असला, तरी मालक आणि व्यवसाय यांना कायदेशीररीत्या समान अस्तित्व असल्याने, एकमेव मालक म्हणून काही वित्तीय जोखमी आणि मर्यादाही येतात, ज्या व्यावसायिकाला अडचणीच्या ठरू शकतात. म्हणूनच अधिकाधिक उद्योजक हल्ली एलएलपी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप), प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एक व्यक्ती कंपनीची निवड करीत आहेत.

- प्रतीक कानिटकरव्यवसायाची सुरुवात करण्याचा ‘एकल स्वायत्त’ म्हणजेच ‘प्रोपरायटरी कन्सर्न’ हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक मार्ग जरी असला, तरी मालक आणि व्यवसाय यांना कायदेशीररीत्या समान अस्तित्व असल्याने, एकमेव मालक म्हणून काही वित्तीय जोखमी आणि मर्यादाही येतात, ज्या व्यावसायिकाला अडचणीच्या ठरू शकतात. म्हणूनच अधिकाधिक उद्योजक हल्ली एलएलपी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप), प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एक व्यक्ती कंपनीची निवड करीत आहेत.‘प्रोपरायटरी कन्सर्न’ व्यावसायिकांना होणाºया प्रमुख अडचणींचा घेतलेला हा आढावा.१. अमर्यादित वैयक्तिक जोखीम / अमर्यादित नुकसान दायित्व :-‘प्रोपरायटरी’ प्रकारच्या व्यवसायात व्यवसाय आणि मालकामध्ये कोणताही वैधानिक भेद नसतो, म्हणजेच ‘व्यवसायाचे वेगळे पॅन कार्ड नसते’ आणि म्हणूनच जर व्यवसायात नुकसान सोसावे लागले, तर मालकांच्या खासगी मालमत्तेचा उपयोग व्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी केला जाऊ शकतो.उदा. जीएसटी आणि नोटाबंदीच्या अंमलबजावणीनंतर, पॅन आणि आधार कार्डाने संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात कमालीचे महत्त्व प्राप्त केले आहे आणि आता जीएसटी अंतर्गत प्रोपरायटरकडून काही गैरअनुपालन झाल्यास, उद्योजकाची सर्व वैयक्तिक मालमत्ता, जीएसटी आणि थकबाकी वसुलीसाठी जोडली जाऊ शकते. जसे की, प्रोपरायटरचे बचतखाते, मुदत ठेव, आवर्ती ठेवी, म्युच्युअल फंड, एलआयसी पॉलिसी, चालू खाते, घर आणि स्थावर मालमत्ता, सोने, अगदी रेल्वेपास व मोबाइल आणि बिल, अन्य वैयक्तिक मालमत्तेवर जप्ती येऊ शकते. कारण एकमात्र प्रोपरायटरशीप फर्मला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मानले जात नाही. व्यावसायिक नुकसानामुळे मालकी हक्कांवर गदा येऊ शकते व खºया अर्थाने व्यवसाय घरावर येतो. कंपनी व्यवसायाच्या संरचनामध्ये (प्रायव्हेट कंपनी/एलएलपी) व्यवसाय मालमत्ता आणि वैयक्तिक मालमत्ता या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. व्यवसायाचे वेगळे पॅन कार्ड असल्याने व्यवसायाशी निगडित दावे मालकाच्या वैयक्तिक मालमत्तांवर येत नाहीत.२. भांडवल वाढवण्याची अक्षमता‘प्रोपरायटरी कन्सर्न’ प्रकारात व्यावसायिक पैसे उभारण्याकरिता समभाग विक्री करू शकत नाहीत, त्यामुळे कर्ज आणि इतर निधी मिळवणे अधिक कठीण होते. गुंतवणूकदार प्रोप्रायटरशीप प्रकारात गुंतवणूक करत नाही.३. व्यवसायकालीन मर्यादापॅन कार्ड एकच असल्याने मालकाच्या मृत्यूसोबत व्यवसायाचाही अंत होतो आणि त्यामुळे वारसाप्रणाली लागू होत नाही. कंपनी व्यवसायात मात्र शाश्वत अस्तित्व असल्याचे म्हटले जाते, म्हणजेच हा व्यवसाय मालक, संचालक आणि शेअरधारक यांच्या पश्चातही चालू राहतो.४. व्यवस्थापकीय कौशल्य अभावएकमात्र मालक व्यवस्थापन तज्ज्ञ असू शकत नाही. तो / ती प्रशासन, नियोजन इ.मध्ये तज्ज्ञ असला, तरी विपणन क्षेत्रात कमकुवत असू शकतो. पुन्हा, मर्यादित आर्थिक संसाधनांमुळे व्यावसायिक व्यवस्थापकाला नोकरीवर ठेवणेही शक्य होत नाही आणि व्यवसायाची प्रगती खुंटते. मर्यादित व्यवस्थापकीय क्षमता, कमी आर्थिक पाठबळ आणि खासगी मालमत्तेची जोखीम यामुळे व्यवसायवाढीवर निर्बंध येतात.५. व्यवसाय हस्तांतरणमालकाचे व व्यवसायाचे पॅन कार्ड एकच असल्याने सर्व रजिस्ट्रेशन्स आणि पत्रक परवाने हे मालकांच्या पॅन कार्डवर रजिस्टर असतात व ते नवीन व्यक्तीला हस्तांतरित करताना नव्याने संपूर्ण रजिस्ट्रेशनची प्रक्रि या अमलात आणावी लागते. त्यामुळे व्यवसायाचे कायदेशीर वारसदारांकडे हस्तांतरण केवळ अशक्य होते.६. कर देयता :कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांसाठी खूप कर सवलत आहे ज्यात आरोग्य, शैक्षणिक हेतूसाठी कर सूट इ. आहे. ही तरतूद कंपनी व्यवसायाच्या संरचनानुसार प्रोपरायटरी प्रकाराला लागू नाही.७. व्यवसाय विश्वासार्हता नसणेआज ग्राहक, विक्रेते आणि गुंतवणूकदार त्यांच्याशी व्यवसायातील विश्वसनीयता शोधतात.‘प्रोपरायटरी कन्सर्न’ म्हणून व्यवसाय सुरू केल्यास, कंपनीचे नाव कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसते. त्यामुळे आॅनलाइन कंपनी किंवा एलएलपी डेटाबेसमध्ये शोधता येत नाही.बºयाचदा, व्यवसायाच्या अस्तित्वाचा विश्वासार्ह पुरावा नसतो. त्यामुळे बँक खाते उघडणे, प्रतिष्ठित ग्राहक मिळवणे किंवा विक्रेत्यांकडून कर्ज घेणे कठीण होते.कमी कायदा पालन आवश्यकतांमुळे पुष्कळ उद्योजक ‘प्रोपरायटरी कन्सर्न’ म्हणून त्यांचे व्यवसाय सुरू करतात; परंतु जसजसा व्यवसाय वाढतो, त्याप्रमाणे उद्योजकाने व्यवसाय पद्धतीतही बदल अंगीकारणे अपेक्षित आहे.पुढील लेखात आपण हे रूपांतर कशाप्रकारे करता येईल यावर चर्चा करू. 

टॅग्स :Marketबाजार