शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
3
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
4
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
5
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
6
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
7
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
8
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
9
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
10
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
11
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
12
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
13
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
14
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
15
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
16
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
17
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
18
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
19
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
20
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत राज्यभर पावणेसहा लाख लीटर दारू जप्त

By admin | Updated: April 24, 2017 03:03 IST

महामार्गावर दारूविक्री बंद करण्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे

जमीर काझी / मुंबईमहामार्गावर दारूविक्री बंद करण्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्या दहा दिवसांत जवळपास साडेपाच हजार गुन्हे दाखल करत तब्बल ५ लाख ७१ हजार ३१० लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी सूचना केलेल्या ‘क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारू बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या ४ हजार ७२७ जणांना अटक केली आहे. तर अडीच कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. एप्रिलच्या अखेरच्या दहा दिवसांतही अशाच कारवाईचा धडाका सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १ एप्रिलपासून महामार्गावर ५०० मीटर अंतरावर दारूविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व आयुक्त, पोलीस अधीक्षकांना आपापल्या घटकांत अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली होती. पोलीस ठाण्यातील दैनंदिन काम करत हे ‘आॅपरेशन’ पार पाडून त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावयाचा होता. त्यानुसार पहिल्या दहा दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल विविध घटकप्रमुखांकडून मुख्यालयात सादर करण्यात आला आहे. त्यानुुसार १ ते १० एप्रिलमध्ये राज्यभरातून पोलिसांनी ३ लाख ६२ हजार ७४९ लीटर दारू जप्त केली, तर दोन लाख ८ हजार ५६१ लीटर दारू नष्ट केली आहे. त्यासाठी एकूण ५,४९२ गुन्हे दाखल करून ४ हजार ७२७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण दोन कोटी ४१ लाख ९८ हजार ३५१ रुपये किमतीचे मद्य ताब्यात घेतल्याचे अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी सांगितले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आंबेडकर जयंती व अन्य कार्यक्रम असल्यामुळे मोहिमेला स्थगिती दिली होती. आता पुन्हा २० ते ३० एप्रिलपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असेही बिहारी यांनी सांगितले.