शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, चंद्रकांत पाटील अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:16 IST

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे.  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह  भाजपाचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या 5 सदस्यीय उपसमितीची स्थापना

मुंबई, दि. 13 - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे.  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह  भाजपाचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या 5 सदस्यीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठी समाजाने विराट मूक मोर्चा काढला होता. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला होता. मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठा मोर्चावेळी म्हटलं होतं.मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 ऑगस्ट रोजी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा --  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांमध्ये सवलती मिळणार.-  शिष्यवृत्तीसाठी 60 टक्क्यांची अट काढून 50 टक्के करण्यात आली आहे. - ओबीसी विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.- अण्णासाहेब पाटील महामंडळांकडून शेतकरी कुटुंबातील तीन लाख तरूण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच बँकांकडून दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येईल. - मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार त्याच्या बांधकामासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील. - सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, सध्या हे प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे आहे. - कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. - तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार.- मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात येईल, ही समिती मराठा संघटनांबरोबर दर दोन ते तीन महिन्यांनी चर्चा करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.  

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस