शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पोटच्या गोळ्यांना केले 'सर्जा-राजा'

By admin | Updated: July 8, 2016 17:51 IST

अठराविश्व दारिद्र्य त्यात दरवर्षी नापिकी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्यामुळे हतबल झालेला पळासखेडे (रुपनगर) येथील धारासिंग सरिचंद वंजारी यांनी आपल्या पोटच्या पोरांना सर्जाराजा बनवून

ऑनलाइन लोकमतभडगाव, दि. ८ : अठराविश्व दारिद्र्य त्यात दरवर्षी नापिकी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्यामुळे हतबल झालेला पळासखेडे (रुपनगर) येथील धारासिंग सरिचंद वंजारी यांनी आपल्या पोटच्या पोरांना सर्जाराजा बनवून शेतीची मशागत सुरू केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, रुपनगर येथील अतिशय गरीब कुटुंबातील अल्पभुधारक शेतकरी धारासिंग वंजारी यांनी शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल नसल्यामुळे मशागतीसाठी त्याने हे पाऊल उचलले आहे.

त्यांच्याकडे वडिलोपार्जीत तीन एकर शेती आहे. परंतु शेती हलक्या प्रतिची असल्यामुळे जो पैसा शेतीसाठी खर्च होतो तितके उत्पन्न निघत नाही. दरवर्षी पावसाचा लहरीपणामुळे शेतीत नापिकी होत आहे. शेतात भरघोस उत्पन्न यावे यासाठी त्यांनी कर्ज काढून विहीर खोदली, ठिबक केले परंतु विहिरीला पावसाअभावी मुबलक पाणी नाही. शेतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो ते भांडवल त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या दोघा मुलांना सर्जा राजा बनवून शेती मशागत करण्याचे कष्टाचे तंत्र अवलंबले आहे.

शेतीची कामे सर्वत्र जोरात सुरू असल्याने बैल जोडीचेही कामाचे दरही वधारले आहेत. एका वेळी बैलजोडीने शेतीची मशागत करण्याचे ठरवले म्हणजे एक हजार रुपये रोज आहे व पिकांची निंदणी करण्याचा स्त्रियांचा एका दिवसाला दीडशे रुपये. एवढे भांडवल नसल्यामुळे त्यांची मुलं धनसिंग (इ.१०वी) व विशाल (इ.८ वी) हे दोन्ही शाळा बुडवून आपल्या वडिलांना शेती कामात मदत करतात. त्यांना पत्नी कमलबाई राबत आहे. ेमजुरी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे आम्हाला हे सगळं करावे लागते, अशी माहिती या शेतकऱ्याकडून मिळाली.

शेतीसाठी बियाणेही उधारीने आणावे लागले. आता पुन्हा शेती मशागतीसाठी पैसे कुठून आणावेत हा प्रश्न होताच दुसऱ्याकडे मजुरी करुन घरच्या शेतीची कामेही ते करतात. मशागतीसाठी बैलजोडी मिळण्यास उशीर झाल्यास शेतात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असते. वेळेत मशागत केल्यास शेतात गवतही होत नाही आणि म्हणूनच पैशांची बचत करण्यासाठी या शेतकऱ्याने अपार कष्टाचे हे तंत्र नाईलाजाने स्वीकारले. यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट असल्यामुळे हाताला काम नाही. अशात शेतकऱ्याने हातात भांडवल नाही म्हणून हतबल न होता मेहनतीने शेतात सोनं पिकवू अशी जिद्द मनाशी बाळगली आहे.कर्ज काढून विहीर खोदली, ठिबक केले, मुलीचेही लग्न केले. परंतु दरवर्षी शेतीसाठी जो खर्च होतो तोही निघत नाही. तर कर्ज कुठून फिटेल. या कर्जापायी गेल्या दोन वर्षापासून ही नवी शक्कल लढवली. पोटच्या गोळ्यांना औताला जुपतो व पूर्ण शेतीची मशागत करतो. यामुळे शेती मशागतीसाठी होणारा खर्च वाचतो व वेळेवर शेतीही तयार होते.-धारासिंग सरीचंद वंजारी, रुपनगर पळासखेडेअल्पभूधारक शेतकरी.