शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित वा बरखास्त करावे: नीलम गो-हे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 18:17 IST

कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी स्वतंत्र झेंड्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र झेंड्याची मागणी म्हणजे कर्नाटकच्या कॉग्रेसी राज्यकर्ताची दळभद्री कल्पना अशी मागणी म्हणजे दक्षिणेकडील राज्यांत राष्ट्रीय भावनेचा -हास होत असल्याचा पुरावादेशाच्या तिरंग्याला दुय्यम समजण्यापलिकडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांची मजल जावी ही विषारी प्रव्रुत्ती आहे.

मुंबई, दि. 28 - कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी स्वतंत्र झेंड्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र झेंड्याची मागणी म्हणजे कर्नाटकच्या कॉग्रेसी राज्यकर्ताची दळभद्री कल्पना असल्याचं त्या  विधानपरिषदेत म्हणाल्या. तसंच केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित करावे वा बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या विषारी प्रवृत्तीचा निषेध करुन केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित करावे अथवा बरखास्त करावे असा ठराव या विधान परिषदेत व विधानसभेत एकमताने मंजूर करावा असं त्या म्हणाल्या.देशात भाषावाद राज्य रचना या मागे भौगोलिक व सांस्कृतिक जोपासनेतून त्या त्या राज्यांची अस्मिता शाबूत रहावी व सर्व दृष्टीने विकास व्हावा ही भावना होती. राज्याला स्वतंत्र झेंड्याची मागणी म्हणजे या भावनेतून निर्माण झालेल्या राज्यातून सार्वभोम या भारताच्या एकात्मतेला तडा जाईल अशी मागणी आहे.  कर्नाटक सरकारने त्या राज्याचा वेगळा स्वतंत्र झेंडा असावा अशी मागणी करणे हा कर्नाटकच्या कॉग्रेसी राज्यकर्त्यांची ही दळभद्री कल्पना आहे. ही मागणी म्हणजे  देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आहे.  देशाच्या स्वातंत्रासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटींशांविरुध्द लढा देवून हौतात्म्य पत्करले आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या निर्मितीनंतर या देशाचा तिरंगा फडकवू लागला त्या देशातील स्वातंत्रवीरांच्या आणि तिरंग्याचा अवमान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देश सुरक्षित रहावा यासाठी सीमेवर लढणा-या जवानांचाही हा अपमान आहे. अशी मागणी म्हणजे दक्षिणेकडील राज्यांत राष्ट्रीय भावनेचा -हास होत असल्याचा पुरावा आहे. महाराष्ट्र राज्य हे नुसते पुरोगामी राज्य नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी या राज्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी हौतात्म्य पत्करलेले आहे, असं गो-हे म्हणाल्या. ज्यावेळी देशाच्या संरक्षणासाठी हिमालयाने सहयाद्रीला हाक दिली, त्यावेळी हा महाराष्ट्र सर्वस्वाचा त्याग करुन देशाच्या सुरक्षिततेसाठी खंबीरपणे उभा राहीला हा इतिहास आहे. देशाच्या तिरंग्याला दुय्यम समजण्यापलिकडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांची मजल जावी ही विषारी प्रव्रुत्ती आहे. या विषारी प्रवृत्तीचा निषेध करुन केंद्र शासनाने तात्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित करावे अथवा बरखास्त करावे असा ठराव या विधान परिषदेत व विधानसभेत एकमताने मंजूर करावा. महाराष्ट्र हा देशाच्या सार्वभौमत्वाला कदापी तडा  जाऊ देणार नाही याची हमी दयावी, अशी मागणी निलम गो-हे यांनी केली.