शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या जाचाने आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 05:47 IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी एका प्रकरणावरून खडसावल्याने नैराश्येपोटी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

ठाणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी एका प्रकरणावरून खडसावल्याने नैराश्येपोटी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. दरम्यान, दरेकर यांची ठाणे शहर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.कापूरबावडी परिसरातील हॉटेल आमराई येथे १५ दिवसांपूर्वी हाणामारीचा एक प्रकार घडला होता. हा तपास उपनिरीक्षक देशमुख यांच्याकडे होता. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न करूनही ते त्यांना मिळाले नव्हते. यासाठी दरेकर यांनी त्यांना वारंवार आदेशही दिले होते. अखेर, या प्रकरणातील चौघे आरोपी शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याकडे हजर झाले होते. आता या आरोपींना तातडीने अटक करा आणि न्यायालयात त्यांना हजर करा, असे आदेश दरेकर यांनी देशमुख यांना दिले. मात्र, त्यांना स्टेशन हाउस ड्युटी (ठाणे अंमलदार) असल्यामुळे त्यांनी आजऐवजी उद्या (शनिवारी) अटक करते, असे सांगितले. त्यानंतर, दरेकर यांनी देशमुख यांना फैलावर घेतले.रागाच्या भरात दरेकर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्यामुळे त्या शांत राहिल्या. नंतर त्या स्टेशन हाउसमध्ये येऊन रडल्या. काही वेळाने पोलीस ठाण्यातील डायरीमध्ये तब्येत बरी नसल्यामुळे घरी जात आहे. त्यामुळे पुढील कर्तव्य करूशकत नसल्याची नोंद करून त्या वर्तकनगर येथील आपल्या घरी परतल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी फिनाइल कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात ११.३० वा.च्या सुमारास दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. याबाबत, दरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.>दरेकर यांची बदलीया प्रकरणाची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश त्यांनी वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना दिले आहेत. चौकशी होईपर्यंत दरेकर यांना नियंत्रण कक्षामध्ये हलवण्यात आले आहे. तोपर्यंत कल्याणराव कर्पे यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची प्रभारी सूत्रे राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.दरेकर यांच्याविरुद्ध आणखीही काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी असून ते अगदी क्षुल्लक कारणावरूनही अधिकारी, कर्मचाºयांना धारेवर धरत असल्याची माहिती याच पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाºयाने ‘लोकमत’ला दिली.>एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याच्या वादावादीतून नैराश्येपोटी देशमुख यांनी फिनाइल प्राशन केले. या प्रकरणी चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.- अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्या