शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:46 IST

Shiv Sena Shinde Group News: मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात आलेल्या प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Shiv Sena Shinde Group News: दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. प्रकाश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

राज्यभरात २९ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि राज्यभरात अनेक ठिकाणी मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विधानसभा आणि नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकीची लय कायम ठेवण्यावर शिवसेना शिंदे गटाचा भर असणार आहे. शिवसेना शिंदे गटातील इन्कमिंगही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात आलेल्या प्रकाश महाजन यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी प्रकाश महाजन यांची नियुक्ती

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे, असे पत्र देण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदेंचे अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही

अडीच वर्ष महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटलेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कुशलतेने हाताळला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचे काम शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेत केले. हा त्यांचा मोठेपणा आहे. शिंदे यांनी केलेले काम लोक विसरणार नाहीत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले.  हिंदुत्वाविषयी जागरुक असलेले शिंदे कडवे हिंदुत्ववादी नेते आहेत, असेही प्रकाश महाजन यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटले होते.

दरम्यान, मनसेमध्ये सक्रिय असलेल्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही वाट्याला उपेक्षाच आल्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे महाजन यांनी समाजमाध्यमावर  जाहीर  केले होते. केवळ हिंदुत्वाचा विचार जगला पाहिजे, यासाठी आपण पक्षात होतो, असे प्रकाश महाजन त्यावेळी म्हणाले होते.   

 

English
हिंदी सारांश
Web Title : Prakash Mahajan gets key role in Shiv Sena after joining.

Web Summary : Prakash Mahajan joined Shiv Sena Shinde group and was appointed as spokesperson by Eknath Shinde, ahead of municipal elections. He praised Shinde's work and commitment to Hindutva after leaving MNS.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण