मुंबई : महाराष्ट्रातील वरिष्ठ आयएएस अधिका:यांना आपल्या टिममध्ये घेण्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे.
राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी हे ग्रामविकास विभागात गडकरी यांचे ओएसडी म्हणून जाणार होते. तथापि, आता ते केंद्रात सहसचिव म्हणून नियुक्त होणार असून त्यानंतर ते गडकरी यांच्याकडेच असलेल्या जहाजबांधणी विभागात लवकरच रुजू होण्याची शक्यता आहे. परदेशी यांच्याकडे अत्यंत तडफदार अधिकारी म्हणून पाहिले जाते. विविध विभागांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून लवकरच रुजू होण्याची दाट शक्यता आहे. मेहता यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला असला तरी गडकरी यांच्या कार्यालयातील सूत्रंनी मेहता महामार्ग प्राधिकरणात येत असल्याचे सांगितले. गडकरी राज्यात बांधकाम मंत्री असताना त्यांचे अत्यंत नजीकचे असे निवृत्त सनदी अधिकारी आर.सी.सिन्हा हे याआधीच भृपृष्ठ वाहतूक विभागात सल्लागार म्हणून रुजू झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)