शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सेनेला ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला औरंगाबादेत अमान्य

By admin | Updated: January 21, 2017 00:41 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विजय सरवदे,

औरंगाबाद- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हाभरात या निवडणुकीचाच माहोल आहे. असे असले तरी युती-आघाडीबद्दल सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परवापर्यंत शिवसेना - भाजपा युतीसंबंधी झालेल्या दोन्ही बैठका फिसकटल्या आहेत. मागील निवडणुकीतील जागावाटपाच्या फार्म्युल्यावर सेना ठाम आहे, तर या वेळी दोन आमदार आणि दोन नगराध्यक्ष, नगरसेवक वाढले असल्यामुळे जिल्ह्यात आमची ताकद वाढली असल्याचा दावा करून भाजपाने शिवसेनेपुढे ‘फिफ्टी- फिफ्टी’चा फॉर्म्युला ठेवला आहे. भाजपाचा हा फार्म्युला मात्र शिवसेनेला अमान्य आहे. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्यातरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व भाजपाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे मनसुबे वाढले आहेत. या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस-१५, राष्ट्रवादी काँग्रेस-१०, शिवसेना-१९, भाजपा-६, मनसे-७ आणि अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, मनसेच्या मदतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली सत्ता खेचून घेतली.गेल्या पाच वर्षांत घडलेल्या झेडपीतील अनेक घडामोडी राजकीय पटलावर लक्षवेधक ठरल्या. काँग्रेसने खेचून आणलेली सत्ता कायम टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेचे निवडून आलेल्या उमेदवारांपैकी चार जण काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.।अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच बादऔरंगाबाद जिल्हा परिषदेत पूर्वी ६० गट व १२० गण होते. लोकसंख्येच्या निकषानुसार निवडणूक आयोगाने गट व गणांची नव्याने फेररचना केल्यानंतर आता दोन गट व चार गण वाढले आहेत.त्यानुसार ६२ गट व १२४ गण निर्माण झाले. औरंगाबाद तालुक्यात आता १० गट, पैठण तालुक्यात ९, गंगापूर तालुक्यात ९, वैजापूर तालुक्यात ८, खुलताबाद तालुक्यात ३, फुलंब्री तालुक्यात ४, कन्नड तालुक्यात ८, सिल्लोड तालुक्यात ८ आणि सोयगाव तालुक्यात ३ गट झाले आहेत.गट व गणांच्या फेररचनेनंतर आरक्षणही नव्याने निश्चित झाले असून, अनेक ठिकाणी मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला गेला तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.