शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कांदा विक्रीसाठी इतर राज्यात पाठवा, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 21:30 IST

राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर राज्यात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

मुंबई, दि. 25 - राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर राज्यात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.राज्यातील कांदा इतर राज्यात निर्यात करण्याबाबत मंत्रालयातील दालनात पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. बैठकीत खोत यांनी राज्यातील कांदा इतर राज्यात निर्यात करण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी, कांदा उत्पादक शेतकरी यांचे १० जणांचे शिष्टमंडळ तयार करावे. या पथकाने पंजाब बाजार समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेली कांद्याची आवक-जावक, राज्यातील कांदा साठविण्यासाठी लागणारे गोदाम, बाजार भाव, लहान व्यापारी याबाबत माहिती घ्यावी, असे सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर कांदा निर्यात करण्यासाठी ५ ट्रक भाड्याने घेण्यासाठी आणि पंजाब बाजार समितीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून गोदाम घेण्यासाठी पणन मंडळाने तरतूद करावी, असे निर्देश राज्यमंत्री खोत यांनी दिले.

तर गेल्या काही दिवसांपूर्वीच लासलगावात बंद असलेल्या कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी कांदा आवक घटली होती, लिलावामध्ये सरासरी भाव १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. मागील प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीतील कांदा व्यापा-यांवर धाडी टाकल्याने कांदा व्यापा-यांकडून बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी शेतक-यांच्या अडवणुकीची भूमिका घेतल्यास व्यापा-यांचे परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिका-यांनी बोलाविलेल्या बैठकीत बाजार समित्या आणि व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांनी लिलाव सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याची आवक नेहमीपेक्षा काहीशी कमी झाली. बाजारभाव प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपयांदरम्यान राहिले. लिलाव बंद होण्याच्या आधी असलेल्या पातळीवरच भाव कायम राहिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.दिल्ली शासनासोबत चर्चा करणारदिल्ली शासनाची राज्यात धान्य व इतर साहित्य विक्रीसाठी रेशन दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कांदा दिल्लीमध्ये विक्री करण्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री व शासनासोबत चर्चा करावी. त्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठविण्याबाबतचे निर्देश राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.