शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदारांसाठी सेनेचे दार आजही खुले - अरविंद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 06:50 IST

Arvind Sawant : भाजपने दुकान मांडून, आमदार विकत घेऊन धंदा सुरू केला आहे. यासाठी सूरत, गुवाहटी, गोव्याचा पैसा कुणी खर्च केला? ही भ्रष्टाचारी जनवादी पार्टी आहे, अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.

मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडाला साथ देत त्यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेतील काही आमदारांसाठी शिवसेनेचे परतीचे दोर कायम आहेत. मात्र, काही लोकांनी स्वतःहून हे परतीचे दोर कापले असल्याने त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका शिवसनेचे नेते अरविंद सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. 

आमचे दरवाजे आजही खुले आहेत. ज्यांना वाटते त्यांनी अजूनही विचार करावा, असे आवाहन आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत असताना करत आहेत. याबाबत विचारले असता, सावंत म्हणाले की, परतीचे दोर कापले आहेत, असे उद्धव ठाकरेंसह शिवसेनेतील कुणीही म्हटलेले नाही. मात्र, कुठल्या गद्दारांना क्षमा करावी, हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. कारण काहींनी स्वतःहून परतीचे दोर कापले आहेत.

ईडीच्या कारवाईला भिऊन हे लोक पळालेले आहेत. यांचा हिंदुत्वाशी, भगव्याशी काहीही संबंध नाही. हे बंडखोर गद्दारच आहेत. भाजपने दुकान मांडून, आमदार विकत घेऊन धंदा सुरू केला आहे. यासाठी सूरत, गुवाहटी, गोव्याचा पैसा कुणी खर्च केला? ही भ्रष्टाचारी जनवादी पार्टी आहे, अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.

शिरसाटांचे ट्विट ब्लॅकमेल करण्यासाठीशिंदे गटाबरोबर गेलेले, मात्र मंत्रिपद न मिळालेले आमदार संजय शिरसाट नाराज आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो आपल्या ट्विटरच्या डीपीला ठेवला होता. तसेच उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडिओही ट्विट केला होता. हे तांत्रिक चुकीमुळे झाल्याचा खुलासा करत शिरसाट यांनी हे ट्विट नंतर डिलिट केले. मात्र, व्हिडिओसकट ट्विट तांत्रिक चुकीमुळे कसे होऊ शकते, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. हे सगळे ब्लॅकमेलर आहेत. यांची निष्ठा ना हिंदुत्वाशी आहे, ना विचारांशी आहे, ना शिवसेनेशी, ना फुटिरतावादी गटाशी, यांची निष्ठा खुर्चीशी आहे. हे जनतेची सुद्धा कशी फसवणूक करत आहेत, हे जनतेलाही कळेल, अशा शब्दात सावंत यांनी शिरसाटांचा समाचार घेतला.

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना