शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

एमआयएमबाबत सेनेची गुपचिळी

By admin | Updated: April 4, 2015 04:50 IST

पुणे येथील असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कडाडून विरोध करणारी, निदर्शने करणारी शिवसेना कलानगर येथील ‘मातोश्री’च्या अंगणात येऊन

मुंबई : पुणे येथील असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कडाडून विरोध करणारी, निदर्शने करणारी शिवसेना कलानगर येथील ‘मातोश्री’च्या अंगणात येऊन विखारी भाषेत बोलणाऱ्या ओवेसीबंधूंबाबत गप्प आहे. विशेष म्हणजे ओवेसीबंधू वांद्रे(पूर्व) पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेला टीकेचे लक्ष्य करीत नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांना लक्ष्य करीत आहेत.पुणे येथे काही दिवसांपूर्वी असादुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी शिवसेनेने ही सभा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन केले. त्यामुळे अखेरीस बंद सभागृहात ओवेसी यांना सभा घ्यावी लागली. वांद्रे (पू.) पोटनिवडणुकीत एमआयएमने राजा सिराज रेहबारखान यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या प्रचाराकरिता नौपाडा, बेहरामपाडा या परिसरात अगदी मातोश्रीच्या अंगणात ओवेसीबंधूंच्या जाहीर सभा होत आहेत. या सभांमध्ये हे दोघे तिखट भाषेत भाजपा, काँग्रेसवर टीका करीत आहेत. ही बाब शिवसेनेला गुदगुल्या करणारी व पथ्यावर पडणारी असल्याने शिवसेना थंड असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी एमआयएमने सुरू केली असून, किमान २० ते २५ नगरसेवक निवडून आणण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. १९९२ साली बाबरी मशीद पडल्यावर व मुंबईत दंगे झाल्यावर १९९७ साली झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे मुंबई महापालिकेत २१ नगरसेवक निवडून गेले होते. त्याचवेळी महापालिकेतील काँग्रेसची सत्ता घालवणाऱ्या शिवसेनेलाही बहुमत प्राप्त झाले होते. एमआयएमच्या मुंबईतील कार्यालयाचे भायखळा येथे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्या वेळी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी व अकबरुद्दीन ओवेसी उपस्थित होते. मुंबईतील मुस्लीमबहुल विभागात महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्याचे एमआयएमने ठरवले आहे. एमआयएम महापालिका निवडणुकीत आक्रमक झाली तर शिवसेनाही जहाल भूमिका घेण्याची अथवा परस्परपूरक राजकारण करण्याची शक्यता आहे.