शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चहा विकून सीए बनलेला सोमनाथ अंथरुणावर खिळून

By admin | Updated: March 11, 2017 19:54 IST

चहावाला पंतप्रधान बनू शकतो. या प्रेरणेतून करमाळा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी सोमनाथ गिराम अथक परिश्रमातून चार्टर्ड अकौंटंट-सी.ए.बनला व राज्य शासनाने त्याची दखल घेऊन

नासीर कबीर, आॅनलाईन लोकमत

करमाळा, दि. 11 - चहावाला पंतप्रधान बनू शकतो. या प्रेरणेतून करमाळा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी सोमनाथ गिराम अथक परिश्रमातून चार्टर्ड अकौंटंट-सी.ए.बनला व राज्य शासनाने त्याची दखल घेऊन त्यास कमवा आणि शिका या योजनेचा सदिच्छा दूत-ब्रॅड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून घोषित केले. पण सोमनाथचा अपघात झाल्यानंतर तो सध्या अंथरुणावर खिळून असून घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाच्या मदतीविना त्याचे आयुष्य अंधारात सापडले आहे.

सोमनाथ बळीराम गिराम हा युवक करमाळा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी असून गरिबीच्या परिस्थितीवर मात करीत जिद्द, चिकाटी अंगी बाळगून संघर्ष करीत स्वत:चे व कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी पुण्यात फुटपाथवर चहाचे दुकान थाटून काम करीत वाणिज्य,सहकार विभागाची पदवी घेऊन गतवर्षी २०१६ मध्ये अ वर्गात सी.ए. बनला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सी.ए.बनलेल्या सोमनाथ गिरामची राज्य शासनाने दखल घेतली. कमवा व शिका या योजनेचा सदिच्छादूत म्हणून त्याची निवड केली.

८ सप्टेंबर २०१६ रोजी सोमनाथ अकलूज येथून सांगवी (ता.करमाळा) येथे येत असताना तो ज्या वाहनात येत होता त्या वाहनाचे स्टेअरिंग लॉक झाल्याने गाडी पलटी झाली. त्यात त्याच्या मणक्याला मार लागला.मणक्यातील मज्जारज्जू दबल्याने कमरे खालील भाग निकामी झाला आहे. त्याला उठून चालता येत नाही.सोमनाथ गिराम यास अद्ययावत उपचारांची गरज आहे, पण त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो उपचार घेऊ शकत नाही. मुलाच्या अपघाताचा धक्का सहन न झाल्याने डिसेंबर २०१६ मध्ये सोमनाथच्या मातोश्री किशोरी गिराम यांचा मृत्यू झाला.

सोमनाथ गिरामकडे पैसा नसल्याने त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीत. पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शासनाकडून केवळ लाख रुपयांची मदत झाली. त्याशिवाय गरवारे महाविद्यालयाने पन्नास हजार रुपयांची मदत केली. सोमनाथचे वडील बळीराम यांनी उसनवारी, कर्ज करून ५० हजार रुपये औषधोपचारावर खर्च केले आहेत. दहा ते बारा लाख रूपये उपचारावर खर्च होऊनही सोमनाथ बरा होत नसल्याने तो निराश बनला आहे. सोमनाथ गिरामला मदतीची अपेक्षा आहे़ सरकारकडे याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ आयुष्य अंधकारमय बनले...सांगवी येथे लहान भाऊ श्रीकांत उर्फ मुन्ना व वयोवृध्द वडील बळीराम असून तेच त्याची आता देखभाल करीत आहेत.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जिद्द व चिकाटीतून त्याने मिळवलेल्या यशानंतर राज्य शासनाने त्यास ह्यकमवा आणि शिकाह्ण या योजनेचा ब्रॅड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून घोषित केले खरे, पण त्यास कसलीही आर्थिक मदत केलेली नाही. आता तो अंथरुणावर व स्ट्रेचरवर आहे तरीही राज्य शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुणवंत सोमनाथ गिरामचे आयुष्य अंधकारमय बनले आहे.