शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

'आत्मनिर्भर' भारतातली 'श्रीमंत' माणसं ; 8 हजार औषधी वनस्पतींचा 'आदिवासीं'कडे खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 14:43 IST

अनेक वर्षांचा औषधी वनस्पतींचा ठेवा जतन केला समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. 

ठळक मुद्देरोजगारासाठी, आरोग्यासाठी व्हावा उपयोग ; संशोधन प्रकल्प राहतात पडून 

पुणे : आदिवासी भागात ८ हजारहून अधिक औषधी वनस्पती असल्याची नोंद पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यांचे औषधी गुणधर्मही सांगितले आहेत. आता त्यावर सरकारने योग्य नियोजन करून त्या त्या आदिवासी भागात संशोधन केंद्र, वनस्पती जतनासाठी मार्गदर्शन, त्यांची बाजारपेठ तयार करणे आदींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यातून आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल आणि लोकवनस्पतींचे संवर्धन करता येईल. तसेच त्यामुळे समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे आदिवासी भागातील लोकवनस्पती विज्ञान (इथनो बायोलाँजी) हा प्रकल्प काही वर्षांपुर्वी घेतला होता. त्यात देशातील २० संस्थांचा सहभाग होता. देशातून आदिवासी क्षेत्रातून वनस्पतींची माहिती संकलित केली. १० हजारपेक्षा अधिक वनस्पतींची उपयोगिता समोर आली. त्यात ८ हजार वनस्पतींचे २५ हजार औषधी उपयोग नोंदविले गेले. ६ हजार नवीन उपयोग समोर आले. कारण आयुर्वेदात २ हजार वनस्पतींची माहिती आहे, अशी माहिती जेष्ठ वनस्पती तज्ज्ञ डाँ. विनया घाटे यांनी दिली.

सध्या आदिवासीमधील नवीन पिढी पोटापाण्यासाठी शहराकडे येत आहे. त्यांना त्यांच्या भागातच रोजगार उपलब्ध व्हायला हवा. स्थानिक पातळीवर कोणत्या वनस्पती येतात आणि त्यांचे उपयोग, त्याला बाजारपेठ कुठे ही साखळी तयार व्हायला हवी. सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन मार्गदर्शन करून रोजगार द्यायला हवा. ठिकठिकाणी वनस्पती संशोधन केंद्र उभी करून त्याची उपयोगिता सांगायला हवी. तरच हा अनेक वर्षांचा ठेवा जतन होईल आणि आदिवासींना देखील आत्मनिर्भर होता येईल, असे घाटे यांनी सांगितले. झ्र----------------वनस्पतींचे काही औषधी उपयोग मलेरियासाठी सिंकोना साल वापरतात. यातील क्विनाइनमुळे मलेरिया बरा होतो.  अशक्तपणावर हळंद्याचे कंद, शक्तीपातावर निर्गुडीचा पाला, जनावर सुदृढ होण्यास रामन्था खायला देणे, कावीळ झाल्यावर अखरा हळंद्याचा कंद खायला देणे असे अनेक उपयोग आहेत. ----------------------फक्त संशोधन होऊन उपयोग नसतो. त्यावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अनेकजण संशोधन करतात. सरकारकडे प्रकल्प सादर होतात. पण त्यावर पुढे काहीच होत नसेल तर संशोधनाचा उपयोग कसा होणार ? - डाँ. विनया घाटे, जेष्ठ वनस्पतीतज्ज्ञ ---------------------आयुर्वेदासाठी औषधी वनस्पती लागतात. पण तसे आणून देणारे माहितीगार नाहीत. पुर्वी होते आता नाहीत. आदिवासी भागात सध्या रोजगार नाही. त्यांना वनस्पतींबाबत योग्य दिशा दिली, तर वनस्पती जतन होतील आणि त्यांना काम उपलब्ध होईल. 

- डाँ. सुहास शितोळे, आयुर्वेद तज्ज्ञ  

टॅग्स :PuneपुणेTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाMedicalवैद्यकीयHealthआरोग्यState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार