शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

दोन महिन्यात मिळणार ‘सेलडीड’

By admin | Updated: December 16, 2014 01:14 IST

गेल्या १९ वर्षांपासून ‘सेलडीड’ किंवा तत्सम मालकी हक्क दस्तऐवजाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्रिमूर्तीनगर ‘म्हाडा’ वसाहतीतील ४०० गाळेधारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

प्रकाश मेहता यांची ग्वाही : ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना निर्देशनागपूर : गेल्या १९ वर्षांपासून ‘सेलडीड’ किंवा तत्सम मालकी हक्क दस्तऐवजाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्रिमूर्तीनगर ‘म्हाडा’ वसाहतीतील ४०० गाळेधारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. या गाळेधारकांना दोन महिन्यात ‘सेलडीड’ देण्यात येईल, अशी ग्वाही गृहनिर्माण, कामगार व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. लोकमत नागपूर आवृत्तीच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त मेहता यांनी सोमवारी लोकमत भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.या गाळेधारकांवर झालेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. १९८६ ते १९९५ या १० वर्षांत गाळेधारकांनी म्हाडाकडे मासिक किश्तीने गाळ्यांची पूर्ण किंमत जमा केली. पण म्हाडाने सेलडीड किंवा मालकी हक्काचे दस्तऐवज करून दिले नाही. मेहता यांनी याची गंभीरपणे दखल घेतली. ‘सेलडीड’ मिळायला उशीर का झाला, यासंदर्भात ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा मुद्दा दोन महिन्यात सोडवू, असे ते म्हणाले. यापुढे कुठल्याही गाळेधारकाला मालकीहक्काची कागदपत्रे वेळेतच मिळतील अशी सूचना देण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.नागपूर शहरातील ‘फ्लॅट’च्या किमती बिल्डरांमुळेच वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सात मजली इमारत बांधण्यासाठी प्रति चौरस फूट खर्च १२०० रुपयाच्या आसपास येतो. परंतु त्याला वाढवून २२०० रुपये प्रति चौरस फूट असल्याचे सांगण्यात येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.चार वर्षांत दोन लाख घरे उभारणारमुंबईकरांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्याचा राज्य शासनाचा मानस असून, येत्या चार वर्षांत दोन लाखांहून घरे बांधण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती प्रकाश मेहता यांनी दिली. मुंबईमध्ये जागेची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे गृहनिर्माणासाठी पूर्व उपनगरांतील मिठागारांच्या जमिनीचा उपयोग करण्याचे शासनाने ठरविले आहे. येथे सुमारे १,२५० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. यातील अर्ध्या जागेवर ‘मेगासिटी’ तर उर्वरित जागेवर परवडणाऱ्या किमतीची घरे ‘म्हाडा’तर्फे बांधण्यात येतील. शिवाय ‘ग्रीन बेल्ट’ व ‘नो डेव्हलमेंट झोन’मधील जागांचादेखील वापर करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश मेहता यांनी दिली.रोजगाराच्या संधी वाढत असल्यामुळे कामगार चळवळीत घट दिसून येत आहे. कामगारांच्या हिताला कुठेही बाधा पोहोचणार नाही, असे बदल कामगार कायद्यात करण्यात येतील. उद्योजक व कामगारांमध्ये समन्वय साधण्याचे आमचे प्रयत्न असतील. कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची शासनाची योजना आहे, असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)