शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांची निवड योग्यच, मॅटच्या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 05:04 IST

वयात व शिक्षण शुल्कात सवलत दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराचीही खुल्या प्रवर्गातील जागेसाठी निवड केली जाऊ शकते, ही राज्य सरकारची भूमिका कायद्याशी विसंगत नाही. संबंधित मागसवर्गीय उमेदवारांना शिक्षण शुल्कात व वयात सवलत दिली असली, तरी निवड निकषांत कोणतीही सवलत दिली नाही,

मुंबई : वयात व शिक्षण शुल्कात सवलत दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराचीही खुल्या प्रवर्गातील जागेसाठी निवड केली जाऊ शकते, ही राज्य सरकारची भूमिका कायद्याशी विसंगत नाही. संबंधित मागसवर्गीय उमेदवारांना शिक्षण शुल्कात व वयात सवलत दिली असली, तरी निवड निकषांत कोणतीही सवलत दिली नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)च्या निर्णयावर बुधवारी शिक्कामोर्तब केले.सेवेतील पोलीस कर्मचा-यांमधून उपनिरीक्षकाची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी परीक्षा घेतली होती. त्यानंतर जी निवड यादी जाहीर केली, त्यात ज्यांनी मागसवर्ग प्रवर्गातील जागासांठी अर्ज केले होते, अशा ३१ उमेदवारांची खुल्या प्रवर्गाच्या जागांसाठी निवड झाल्याचे दाखविले गेले होते. ज्यांची निवड झाली नाही, अशा उमेदवारांनी त्याविरोधात मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने या सर्व याचिका फेटाळत निवडयादी योग्य ठरविली. या निर्णयाला याच उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी हंगामी मुख्य न्या. विजया ताहिलरमाणी व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.निवडीच्या निकषांत सवलत नाही-या केसमध्ये राज्य सरकारने परवानगी दिल्यानेच लोकसेवा आयोगाने मागासवर्ग उमेदवारांची खुल्या जागांसाठी निवड केली. मागासवर्गीय उमेदवारांना शिक्षण शुल्कात दिलेली सवलत म्हणजे निवडीच्या निकषांत दिलेली सवलत, असा अर्थ राज्य सरकारने लावलेला नाही. ज्या वेळी सवलत देण्यात आली तेव्हा खुल्या जागांसाठी स्पर्धा सुरू झाली नव्हती. जेव्हा सर्व उमेदवारांनी पात्रतेचे निकष पूर्ण केले, तेव्हाच त्यांना लेखी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे उमेदवार कोणत्या प्रवर्गातील आहे, ही बाब गौण ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट