शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पंतप्रधान दौ-यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

By admin | Updated: April 13, 2017 21:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या नागपूर दौºयादरम्यान कसलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या नागपूर दौºयादरम्यान कसलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. बंदोबस्तासाठी २२०० पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दल तसेच शीघ्र कृती दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. विमानतळ, दीक्षाभूमी, कोराडी आणि मानकापूर क्रीडा संकुलाभोवती कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून, आवश्यक त्या सर्वच खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.  
 पंतप्रधान मोदी १४ एप्रिलला नागपुरात येणार असून, सुमारे ३ तास ३० मिनिटे (प्राथमिक अंदाज) ते येथे वास्तव्याला असतील. या वेळेत त्यांच्याभोवतीचे सुरक्षा कवच कसे राहील, त्याबाबतची तयारी एसपीजीच्या (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) अधिकाºयांनी स्थानिक प्रशासनाकडून करून घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांचे  नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते थेट दीक्षाभूमीला येतील. येथील भेटीनंतर कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे राष्ट्रार्पण आणि तो कार्यक्रम आटोपल्यानंतर मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात आयोजित १०० व्या डिजिधन मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक राहणार आहे. त्यासाठी २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी बॉम्बशोधक आणि नाशक पथकांकडून (बीडीडीएस) कसून तपासणी करून घेण्यात आली असून, सुरक्षेची काही त्रुटी राहू म्हणून आज गुरुवारी सुरक्षेची रंगीत तालीमही घेतली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी पत्रकारांना माहिती दिली.
 पंतप्रधानाच्या दौºयाच्या संबंधाने दहशतवादी संघटनांकडून काही धमकी मिळाली आहे काय, अशी विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या निर्देशानुसार आणि यापूर्वीच्या दौºयातून आलेल्या अनुभवानुसार खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे ते म्हणाले. 
 
निमंत्रितांना आवाहन
मानकापूरच्या कार्यक्रमात केवळ ३२०० निमंत्रितांना पासेस देण्यात आल्या आहेत. त्यांनी सुरक्षेच्या संबंधाने ११ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. कार्यक्रमस्थळी वेगवेगळ्या दर्जानुसार प्रवेशद्वार उभारण्यात आले असून, निमंत्रितांनी निमंत्रण पत्रिकेसोबतच स्वत:चे ओळखपत्र (शासकीय) सोबत ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक वाहनाची तपासणी केल्यानंतरच पार्किंगस्थळी प्रवेश दिला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
 पंतप्रधानांच्या आगमनापासून संबंधित कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर आणि ५ मिनिटे नंतरपर्यंत संबंधित मार्ग सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. अपवादात्मक स्थितीत अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग काढून देण्यात येईल. धोका होऊ  म्हणून पोलीस अ‍ॅम्ब्युलन्सचीही तपासणी करणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, त्या त्या भागातील वाहतूकही वळविण्यात आली आहे. ज्या मार्गाने पंतप्रधान जातील आणि परत विमानतळावर येतील, त्या सर्व मार्गावरची मेट्रो आणि सिमेंट रस्त्याची कामे बंद ठेवण्यात येणार आहे. 
----
रस्ते सील, इमारतीवरही नजर
पंतप्रधान मोदी यांना विमानतळ, दीक्षाभूमी, कोराडी आणि मानकापूर क्रीडा संकुलातील कार्यक्रमस्थळी नेण्याचा आणि तेथून परत विमानतळावर आणण्याचा मार्ग सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिकृतपणे  जाहीर केलेला नाही. मात्र, ज्या मार्गाने पंतप्रधानांचे येणे जाणे राहील, तो मार्ग पोलिसांनी सील केला आहे. गणवेशधारीच नव्हे तर साध्या वेशातील पोलीस या मार्गावर, कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील. या मार्गावरच्या सर्व इमारतींवर सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसल्यास संबंधितांना तात्काळ ताब्यात घेतले जाईल. आणीबाणीच्या स्थितीत पोलिसांनी वेगवेगळ्या भागात तात्पुरत्या निवासाची सुरक्षा व्यवस्था (सेफ हाऊस) सज्ज ठेवली आहे. ऐनवेळी हवाई टेहळणी करण्यात येणार आहे. मात्र,  ड्रोनचा वापर केला जाणार नाही, असेही पोलीस अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.