शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी धावणार मोनोचा दुसरा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:07 IST

रविवारी उद्घाटन : मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुंबई : वडाळा ते जेकब सर्कल (सातरस्ता) या महत्त्वपूर्ण मार्गावरील मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे़ रविवारी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात येईल. मे २०११ मध्ये हा टप्पा सुरु करण्याची मुदत होती़ विविध कारणांमुळे हा टप्पा सुरु होण्यास प्रत्यक्षात २०१९ उजाडले. १०.६ किमी अंतराचा हा टप्पा सुरु झाल्यानंतर मोनोरेलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीए ने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात १५० कोेटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मोनोचे व्यवस्थापन व देखभाल खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षी पर्यंत मोनोरेलसाठी नवीन १० रेक्स घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी दिली. याबाबत निविदा प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

२०१८ च्या सुरुवातीला मोनोरेलचे दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही केवळ पुरेसे रेक्स उपलब्ध नसल्याने ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती. या महिन्याभरात किमान आणखी २ रेक्स वापरात आणता येतील, असा एमएमआरडीएचा विश्वास आहे. सध्या चार रेक्सच्या माध्यमातून मोनोरेलच्या पहिल्या टप्प्याची वाहतूक चेंबूर ते वडाळा मार्गावर चालवण्यात येते. सध्या दरदिवशी मोनोरेलद्वारे प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या सुमारे १८ हजार आहे. १९.५ किमी अंतराच्या पूर्ण मार्गावर सेवा सुरु झाल्यावर मोनोरेलच्या प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ होईल व ही संख्या किमान १ लाख पर्यंत जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मोनोरेलचा पहिला टप्पा अपयशी ठरला असल्याने मोनोरेल यशस्वी होण्यासाठी दुसºया टप्प्यावर विशेष लक्ष आहे. दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर मोनोरेलला चांगला प्रतिसाद मिळेल व हा प्रकल्प यशस्वी होईल, असा दावा अधिकाºयांनी केला आहे. सध्या रेल्वे नेटवर्कपासून दूर असलेल्या भागांमध्ये मोनोरेल धावणार असल्याने मोनोरेलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.५ ते ११ रुपये तिकिटाचे सध्या दर असून त्यामध्ये १० ते ४० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये मोनोच्या पहिल्या टप्प्यातील डब्याला लागलेल्या आगीनंतर ही सेवा स्थगित करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ मध्ये एमएमआरडीए प्रशासनाने ही सेवा आपल्या ताब्यात घेतली आहे.मोनो स्थानकांच्या नामकरणाची मागणी, समितीचा अहवाल आल्यानंतर होणार निर्णयजीटीबी नगर, वडाळा ब्रिज, अ‍ॅणटॉप हिल व दादर पूर्व या मोनोच्या चार स्थानकांचे नामकरण करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. या मागणीवर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या दोन बैठका झाल्या असून अद्याप समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही.समितीच्या अहवालानंतर या स्थानकांचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत निर्णय होण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तवली आहे.अ‍ॅण्टॉप हिल स्थानकाला शेख मिस्त्री, दादर पूर्व स्थानकाला विठ्ठल मंदिर, वडाळा ब्रिज स्थानकाला नाना फडणवीस यांचे नाव देण्याची मागणी आहे. तर, जीटीबी नगर स्थानकाला त्रिमुर्ती शिव, हुतात्मा करुपय्या देवेंद्र यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.