शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकरावी प्रवेशाचा उद्यापासून दुसरा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:29 AM

शून्य फेरीत होणार कोट्यांतर्गत प्रवेश; नियमित फेऱ्यांनंतर विशेष फेरीचे आयोजन

मुंबई : अकरावी प्रवेशाचा पहिला अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना १२ तारखेपासून अर्जाचा दुसरा टप्पा भरता येणार आहे. यासंबंधी मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांची नोंद करू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही असे विद्यार्थीही यादरम्यान नोंदणी करून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. ही प्रक्रिया २२ आॅगस्टच्या रात्री ११ पर्यंत सुरू राहणार आहे.मुंबई विभागामधून आतापर्यंत २ लाख ५१ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यंदा कोटांतर्गत प्रवेश उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून केले जाणार असून त्यातही शून्य फेरीचे आयोजन अकरावी आॅनलाइन प्रवेश यंत्रणेकडून करण्यात येणार आहे. शून्य फेरीनंतर नियमित ३ फेऱ्यांचे आयोजन प्रवेशासाठी करण्यात येणार असून निकषानुसार गुणवत्ता, आरक्षण आणि पसंतीक्रम विचारात घेऊनच प्रवेश दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.नियमित फेºयांनंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल आणि ही फेरी सर्वांसाठी खुली असणार आहे. नेहमीप्रमाणे या प्रत्येक फेरीनंतर विद्यार्थ्यांना विविध पसंतीक्रम देता येतील किंवा बदलता येणार आहेत.अकरावी प्रवेश दुसराटप्पा - वेळापत्रक(१२ ते २२ आॅगस्ट)नियमित फेरीसाठी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरणे. नवीन विद्यार्थी अर्जाचा भाग १ व भाग २ भरू शकतात.कोटांतर्गत प्रवेश करणे.कोटा प्रवेशाच्या रिक्त जागा प्रत्यार्पित करणे. प्रवेश फेरी १२३ ते २५ आॅगस्ट -(दुपारी १२ पासून ते सायंकाळी ५ पर्यंत)तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवणे.शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आक्षेपांवर कार्यवाही.३० आॅगस्ट (३ वाजता)नियमित फेरी १ साठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये संदेश पाठविणे, पहिल्या फेरीचे कट आॅफ संकेतस्थळावर दर्शविणे.३१ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर (१० पासून ५ पर्यंत)विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या महाविद्यालयात आॅनलाइन प्रवेश निश्चित करणे.यादरम्यान व्यवस्थापन, अल्पसंख्याक प्रवेश सुरू राहतील.यानंतरच्या फेºयांचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाकडून नंतर जाहीर करण्यात येईल.अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागा - ३,२०,१२०नोंदणी केलेले विद्यार्थी - २,५१,३७९अर्ज लॉक केलेले विद्यार्थी- १९८७६४कागदपत्रांची पडताळणी झालेले विद्यार्थी - १,८९,२५७

टॅग्स :collegeमहाविद्यालय